शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष गळतीत मनसे राज्यात आघाडीवर?

By admin | Updated: January 26, 2017 00:34 IST

कॉँग्रेसमध्ये गुलजार दाखल : प्रवेश करता क्षणीच मिळाली उमेदवारी

नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या पक्षांतरामुळे अनेक पक्षांना गळती लागली आहे. तथापि, नाशिक महापालिकेत चाळीस पैकी तब्बल २८ नगरसेवकांनी ‘मनसे’ला सोडचिठ्ठी दिली असून, बहुधा राज्यात सर्वाधिक गळती लागलेला मनसे हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरावा अशी स्थिती आहे. या पक्षाचे नगरसेवक गुलजार कोकणी यांनी कॉँग्रेस मध्ये प्रवेश केला असून, आता मनसेचे केवळ १२ नगरसेवक शिल्लक आहेत. विशेष म्हणजे कोकणी यांच्या प्रवेशाने कॉँग्रेसला एका प्रभागात उमेदवार मिळाला असून, पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी यादी होण्याच्या आतच कॉँग्रेसच्या शहराध्यक्षांनी कोकणी यांची उमेदवारी घोषित केली आहे.  मनसेला सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये काही प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि त्यामुळे वातावरणात बदल होईल असा दावा केला. परंतु तसे घडले नाही. उलट गुलजार कोकणी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.  गुलजार कोकणी यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी भाई जगताप, नाशिकचे पालक असलेले विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील आदि उपस्थित होते. मनसेतून दाखल ंझालेल्या कोकणी यांच्यामुळे कॉँग्रेसलाही मोठा आधार मिळाला आहे.  शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधून वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते भाजपाकडून इच्छुक असून, त्यांच्या विरोधात  गुलजार कोकणी यांना थेट उमेदवारीच जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)