शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आणखी एका संशयिताचा सहभाग

By admin | Updated: January 17, 2017 02:06 IST

बनावट नोटा प्रकरण : लवकरच अटकेची शक्यता

नाशिक : एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणात शहरातील आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्यास लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणात आडगाव पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयिताना अटक करण्यात आली असून, हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत़पुणे आयकर विभागाच्या माहितीवरून आडगाव पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे, संदीप सस्ते, रामराव पाटील-चौधरी, रमेश पांगारकर यांच्यासह ११ संशयिताना बनावट नोटा छापून त्यांची कमिशनवर अदलाबदल करताना जत्रा हॉटेल परिसरात अटक केली होती़ त्यांच्याकडून एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक लाख ८० हजार रुपयांच्या जुन्या चलनातील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाही जप्त केल्या होत्या़  पोलिसांनी छबू नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कॉम्प्युटर, शाई, कागद आदि साहित्यही जप्त केले़ तसेच संशयितांच्या बँक खात्यातील तपासणी करून ते सीलही केले़ नागरेकडे नोटा छपाईचे प्रमुख काम करणारा कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या बाराव्या संशयितास अटक करण्यात आलेली आहे़ या संशयितांकडून जमा केलेल्या पुराव्यांनुसार तपास सुरू असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली़ दरम्यान, या गुन्ह्णात पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयितांना अटक केली असली तरी यामध्ये आणखी एकाचा सहभाग समोर आला आहे़ हा संशयित शहरातीलच असून, त्यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही सानप यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)