शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:43 IST

सिन्नर : गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मौल्यवान गणपतीची रक्षा तसेच मंडळ सुरक्षेची पावले उचलावीत. त्याचबरोबर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाºया विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे यांनी केले.येथील सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्यांच्या बैठकीचे ...

सिन्नर : गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मौल्यवान गणपतीची रक्षा तसेच मंडळ सुरक्षेची पावले उचलावीत. त्याचबरोबर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाºया विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे यांनी केले.येथील सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी गिºहे बोलत होते. बैठकीच्या केवळ काही तास आधी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांच्या अपघाती निधनाने बैठकीवर दु:खाचे सावट होते. मात्र गणेशोत्सवास थोडेच दिवस शिल्लक असल्याने बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक साळी यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार नितीन गवळी, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गंगाधर वरंदळ, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा करण्यात आली. विसर्जन मिरवणूक ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत गतिमान ठेवावी, अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली. तसेच ठरावीक ठिकाणीच गणेश विसर्जन करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी शहरांतर्गत वाहतूक नियोजनविषयी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी निर्माल्य पाणीस्रोतात टाकून पाणी दूषित न करण्याची व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोहण्यात तरबेज असणाºया व्यक्तींनी सहकार्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले. नामदेव कोतवाल यांनी संपूर्ण गणेशोत्सवात अविरत बंदोबस्त ठेवणाºया पोलिसांना गणेश मंडळांनी आरतीचा मान द्यावा, अशी सूचना मांडली. हरिभाऊ तांबे यांनी यावर्षी मूर्तिदान संकल्पना राबविली जाणार असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. मनीष गुजराथी यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुलाल विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. येत्या गणेशोत्सवात या सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, रामभाऊ लोणारे, डॉ. दिलीप गुरुळे यांच्यासह नगरसेवक, मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.मूर्तिदान संकल्पना राबविणारहरिभाऊ तांबे यांनी यावर्षी मूर्तिदान संकल्पना राबविली जाणार असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. मनीष गुजराथी यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुलालविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. येत्या गणेशोत्सवात या सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, रामभाऊ लोणारे, डॉ. दिलीप गुरुळे यांच्यासह नगरसेवक, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.