शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण साहित्याच्या  उत्पादनात सहभागी व्हावे : व्ही. एम. डॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 01:00 IST

मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.

सातपूर : मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.  निमात आयोजित नेव्हल एव्हिएशन इंडस्ट्री इंटरॅक्शन या महत्त्वाकांक्षी उपक्र मात ते बोलत होते. डॉस यांनी पुढे सांगितले की, १९९० नंतरच्या मुक्त धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनास चालना मिळाली आहे.नाशिक हे एचएएल मिग विमान उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, नौदलातील रशियन बनावटीची विमाने, हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.  कमांडर राजेश बाबू यांनी सांगितले की, देशांतर्गत उत्पादनाविषयी आढावा  घेऊन उत्पादनक्षम साहित्याची  यादी व अपेक्षति उत्पादन याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.  दुसºया सत्रात नौदलातर्फे पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशनद्वारे देशांतर्गत उद्योगातून साहित्याची खरेदी, डिझाइन, डेव्हलपमेंट, देखभाल, असा संबंधित सेवा देशातून उत्पादित करून घेण्यात येणार असून, त्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कमांडर एन. बालकृष्णन यांनी सांगितले. यावेळी कॅप्टन चेतन घाग, कमांडर जी. एस. संदीप, कमांडर जी. प्रभाकर आदींनी मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक भाषणात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकमधील औद्योगिक वातावरण व उद्योगांची क्षमता याची माहिती दिली. मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले.  यावेळी शशिकांत जाधव, कैलास अहेर, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, उदय रकिबे,  मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर, राजेश गडाख, श्रीपाद कुलकर्णी, कमलेश नारंग, तेजपाल बोरा, गौरव धारकर आदींसह उद्योजक उपस्थित होते.निमाच्या पुढाकाराने उपक्रमखासगी क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नौदलातर्फे विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये निमाच्या पुढाकाराने प्रथमच हा उपक्र म राबविण्यात येत असून, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीस चालना मिळणार आहे. नाशिकच्या उद्योगांमध्ये संरक्षण सामुग्री उत्पादनाची क्षमता असल्याने या उद्योगांनी संरक्षण साहित्य उत्पादनात सहभाग घ्यावा. देशातून बाहेर जाणारी गंगाजळी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉस यांनी केले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीIndian Armyभारतीय जवान