शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपासून शेतकरी संपात सहभागी

By admin | Updated: May 29, 2017 00:24 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपावर जाण्याबाबतचे निवेदन व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीचा ग्रामसभेचा ठराव शेतकऱ्यांनी आमदार व तहसीलदारांकडे सुपूर्द केला.  गेल्या काही वर्षांत पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून ठोस उत्पादन घेता आले नाही. उपलब्ध पाण्यावर उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणेही अवघड झाले आहे. कर्जाचा बोजा वाढत असून, वसुलीसाठी बॅँकांनी शेतकऱ्यांवर सक्ती सुरू केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविण्यास प्रारंभ केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनांमुळे गाव पातळीवरील सामाजिक वातावरण बिघडले आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने तातडीने घेतल्यास गावपातळीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची हमी आम्ही घेऊ, असेही निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपात आम्ही सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी सरपंच वनीता कापडी, सुभाष बर्के, चिंधू डोमाडे, शरद कापडी, अशोक कर्डक, बाळू कापडी, बी. एन. कापडी, मधुकर कापडी, अशोक डोमाडे, बाळू कापसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन ७/१२ कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दूधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज ाुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे आदी मागण्यांचा ठराव देशवंडी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.