शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांच्या मिळकतींना अर्धवट कर माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST

नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले ...

नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिनियमातील त्रुटींमुळे त्यांना अर्धवटच सवलत मिळणार आहे. महापालिकेच्या करात त्यांना सवलत मिळणार असली सरकारी कर मात्र भरावाच लागणार असून तसा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे. शहरात राहणारे माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नी यांना घरपट्टीत सरसकट सूट मिळावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. देशातील आणि राज्यातील काही महापालिकांनी अशी मिळकत कराची माफी दिली आहे. नाशिक महापालिकेनेदेखील महासभेत ठराव केल्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत ही मान्यता देण्यात आली असून त्यानुसार माजी सैनिकाच्या एकाच मिळकतील सूट देण्यात येणार आहे.

अर्थात, महापालिकेच्या घरपट्टीत (मिळकत कर), पाणी पट्टी, पाणी पट्टी लाभ कर, मलनिस्सारण कर, मल निस्सारण कर, सर्वसाधारण कर, शिक्षण उपकर, पथकर व सुधार आकार यांचा समावेश होते. तर महापालिकेच्या करा व्यतिरिक्त सरकारी शिक्षण कर व रोजगार हमी कर तसेच महाराष्ट्र टॅक्स ऑन बिल्डिंग अधिनियमनुसार कर मिळकतींवर कर आकारले जातात. मात्र, शासन निर्णयात शासकीय कर तसेच आग निवारण कर व वृक्ष संवर्धन कर यावर सूट देण्याबाबत नमूद नसल्याने सदरचे कर वगळता इतर करांवर सूट देता येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात सवलत लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सादर करण्यात आला आहे.