शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरासाठी सात ठिकाणी वाहनतळ

By admin | Updated: August 9, 2015 23:08 IST

पर्वणी वगळता नियोजन : पालिकेने खासगी जागांसाठीही मागवले देकार

नाशिक : वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध तिथींना मोठ्या प्रमाणात शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने सात ठिकाणी अंतर्गत वाहनतळांचे नियोजन केले असून, पर्वणीकाळ वगळता ही वाहनतळे उपलब्ध राहणार आहेत. पालिकेने वाढणारी वाहतूक गृहीत धरून काही खासगी जागांवरही वाहनतळांसाठी देकार मागविले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळातील नऊ दिवसांसाठी बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश बंद राहणार असून बाह्य वाहनतळांवर वाहने उभी करून भाविकांना पायी अथवा एसटी महामंडळाच्या बसने शहरात अंतर्गत वाहनतळांवर यावे लागणार आहे. मात्र, कुंभमेळा वर्षभर चालणार असल्याने वेगवेगळ्या तिथींना भाविकांची शहरात होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने शहरातील काही भागात अंतर्गत वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महापालिकेने गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, औरंगाबादरोडवरील निलगिरी बाग, पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयासमोरील लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टची जागा, मुंबई नाक्यावरील हॉटेल संदीप समोरील महापालिकेच्या मालकीची जागा, गोल्फ क्लब मैदानालगतचे ईदगाह मैदान, कालिदास कलामंदिरासमोरील बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान आणि म्हसरूळ रोडवरील मेरीचे मैदान याठिकाणी अंतर्गत वाहनतळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वाहनतळांवर भाविकांना दुचाकी, तीनचाकी तसेच हलक्या व जड वजनाची वाहने लावता येणार आहेत. सदर वाहनतळांसाठी महापालिकेने कंत्राटदारांकडून देकार मागविले आहेत. या वाहनतळांवर पर्वणीकाळात वाहने लावता येणार नाहीत. महापालिकेने वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने डोंगरे वसतिगृह मैदान, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टची जागा तसेच मेरीचे मैदान या जागा केवळ आॅक्टोबरअखेरपर्यंत वाहनतळासाठी नियोजित केल्या आहेत. (प्रतिनिधी)