इंदिरानगर : परिसरातील गीतांजली कॉलनीतील दत्तकृपा अपार्टमेंट समोरील उद्यानास कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी उद्यान विभागाच्या देखभालीअभावीच बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गीतांजली कॉलनी आणि परिसरातील अपार्टमेंट भागात महापालिकेचा सुमारे अडीचशे वाराचा भूखंड पडून असल्याने त्या ठिकाणी परिसरातील काही नागरिक केरकचरा टाकत होते. त्यामुळे या ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी महापालिकेने सदर मोकळ्या भूखंडावर संरक्षण भिंत बांधून लहान मुलांसाठी तीन-चार खेळणी टाकल्या; परंतु नियमित देखभालीअभावी या ठिकाणी गाजरगवत वाढले असून, नागरिकांनी केरकचरा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे उद्यानास कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी उद्यान विभागाच्या देखभालीअभावीच बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस पडून कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
इंदिरानगर परिसरातील उद्यानास बकाल स्वरूप
By admin | Updated: December 1, 2015 22:34 IST