शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान उपआयुक्तांवर आर्थिक मागणीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:09 IST

नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, उपआयुक्तशिवाजी आमले यांनी त्याचा इन्कार केला असून, मुळातच त्यांचे कोणतेही देयक प्रलंबित नाही आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच कारवाईचा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देपुष्पोत्सवाचा ठेका : आमले यांनी केला इन्कार; कारवाई करणार

नाशिक : नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, उपआयुक्तशिवाजी आमले यांनी त्याचा इन्कार केला असून, मुळातच त्यांचे कोणतेही देयक प्रलंबित नाही आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच कारवाईचा इशाराही दिला आहे.महापालिकेत गेल्यावर्षी पुष्पप्रदर्शन झाले होते. त्यात आशिष दिवेकर मल्टी सर्व्हिसेस यांना कामे देण्यात आले होते. हे पुष्पप्रदर्शन पार पडताना मूळ खर्च २४ लाख ७७ हजार रुपये त्यांना देण्यात आला असला तरी त्यावेळी झालेले सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च अद्याप मिळालेला नाही. त्याबदल्यात आमले यांनी अन्य निरीक्षकामार्फत दीड लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप दिवेकर यांनी सोमवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला. सहा लाख रुपयांसाठी ११ महिन्यांपासून आपल्याला त्रास दिला जात असून, त्यामुळे आपले अनेक प्रकारचे कर भरणे थकल्याचे दिवेकर यांचे म्हणणे आहे. आपण यासंदर्भात महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते यांच्याकडेही तक्रार केल्याचे तसेच निरीक्षकाचे कॉल रेकॉर्ड केल्याचेही त्यांनी सांगितले.पुष्पोत्सवाच्या वेळी फ्लॉवर टॉवर, सोफ्याचा वापर करून सेल्फी पॉइंट असे अनेक सुविधा आपण दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुणे येथील कलावंतांना हजारो रुपये दिले. परंतु नंतर मनपाने कार्यक्रम रद्द केला त्याचे पैसे कलावतांकडून मिळणे शक्य नाही आणि महापालिकेकडूनही मिळत नाही. या सर्व अडचणींमुळे आता प्रलंबित सहा लाख रुपयांचे देयक न मिळाल्यास २० फेब्रुवारीस पुष्पोत्सवाच्या वेळीच मनपासमोर सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशारा दिवेकर यांनी दिला आहे.उपआयुक्त आमले यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. तसेच दिवेकर यांच्यावर बदनामी प्रकरणी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दिवेकर यांना मंजूर निविदेपेक्षा अतिरिक्त सहा लाख रुपये देण्याचा कोणताही प्रश्न नाही. पुष्पप्रदर्शनातील कार्यक्रमासाठी कलावंतांना त्यांनी दिलेले पैसे मनपाकडून मागणे, सुरक्षारक्षक न नेमता नुकसानीबाबत महापालिकेला दोष देणे हे अत्यंत चुकीचे आहे. अलीकडेच त्यांनी मुदत संपल्यानंतर निविदा भरण्याची तयारी दर्शविली. त्यास नकार दिल्याने त्यांनी हेआरोप केले असावे, असे आमले यांनी सांगितले.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका