शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना वेळापत्रकाची प्रतिक्षा ; आरटीईच्या संकेतस्थळावर सूचना नसल्याने सांशकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:34 IST

आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के  जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्चलाच संपली आहे. त्यानंतर जवळपास आठवडाभराचा कालावधी उलटत आला तरी प्रवेश पक्रियेचे पुढील वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. त्याचप्रमाणे पहिल्या सोडतीविषयीही कोणतीही सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पालकांची सोडतीविषयी उत्कंठा शिगेला पोहचली असून सोडत लांबत असल्याने प्रवेश प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ  लागली आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रेवश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा पहिली सोडत लांबल्याने पालकांमध्ये साशंकता

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के  जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्चलाच संपली आहे. त्यानंतर जवळपास आठवडाभराचा कालावधी उलटत आला तरी प्रवेश पक्रियेचे पुढील वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. त्याचप्रमाणे पहिल्या सोडतीविषयीही क ोणतीही सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पालकांची सोडतीविषयी उत्कंठा शिगेला पोहचली असून सोडत लांबत असल्याने प्रवेश प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ  लागली आहे. आरटीई अंतगर्गत प्रवेशासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी एकूण १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत संकेतस्थळावर पुढील प्रक्रियेविषयी कोणतीही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी आपल्या पाल्याचा अर्ज दाखल करणाºया पालकांना पहिल्या सोडतीसह वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे. आरटीई अंतर्गत अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी वयोमर्यादेतही वाढ करून २२ मार्चपर्यंत मुदत आठ दिवस वाढवून ३० मार्च केली होती. या वाढीव मुदतीत जवळपासून २ हजार अर्ज दाखल करण्यात आले. ५ हजार ७६४ जागांसाठी यंदा तब्बल पट म्हणजे १४ हजार ९९५ अर्ज संकेतस्थळावर दाखल झाले आहे. अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ४६ अ‍ॅपद्वारे सादर झाले आहेत. दरम्यान, पहिलीच्या प्रवेशासाठी पूर्वनियोजित वयोमर्यादेत वाढ देण्यासोबतच शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्यासाठी २२ मार्चची मुदत वाढवून ३० मार्च केली होती. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठीची मुदत शनिवारी संपली असून, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी (दि.१) सोडतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. 

 नर्सरी प्रवेशासाठी अर्जांचा ढिग आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नाशिक जिल्'ात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यात शहरातील केवळ दोन शाळांमध्ये नर्सरीच्या ३९ जागा उपलब्ध असून या दोन्ही शाळा शहरातील हायप्रोफाईल भागात आहे. असे असतानाही या शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी ढिगभर अर्ज दाखल झाले आहेत. यातील एकाच शाळेसाठी जवळपास ३ ते ४ हजार अर्ज दाखल झाले असून यातील बहूतांश अर्ज हे शाळेच्या एक किलोमीटर परिसराच्या परिघातील आहे. त्यामुळे आरटीईचे अर्ज दाखल करणारे खरोखर याच परिसरात राहतात का, आणि या परिसरात भाडे कराराने राहणारे पालकांचे आर्थिक उत्पन्न आरटीईच्या पात्रता निकषांमध्ये बसते का असे सवाल आरटीईच्या पात्र लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहेत.