शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालक सक्षम, तरी संस्थेसाठी आग्रह

By admin | Updated: June 29, 2014 00:42 IST

धक्कादायक : जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न; मान्यता नसलेल्या संस्थांतही प्रवेश

सुदीप गुजराथी

नाशिकआपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे पालक सर्वत्र दिसत असले, तरी काही पालक मात्र आर्थिक परिस्थिती सक्षम असूनही आपल्या पोटच्या गोळ्याला अनाथ बालकांच्या संस्थेत ठेवण्याबद्दल आग्रही असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पालकांकडून संगोपनाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असताना, यातून चिमुकल्यांचीही परवड होत आहे. अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या संस्थांमध्ये आपल्या पाल्यालादेखील ठेवावे, असा आग्रह अनेक पालकांकडून होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आई-वडील दोघे नोकरीला असूनही ते मूल सांभाळण्याची जबाबदारी घेत नसल्याचे चित्र आहे. उलट आपण पाल्याचे संगोपन करण्यास कसे अक्षम आहोत, याचेच चित्र निर्माण केले जात आहे. महिला व बालकल्याण विभागासमोर आलेल्या काही प्रकरणांतून ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने संबंधित पाल्य संस्थेत ठेवण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करीत आहे का, याची खातरजमा केली जाते; मात्र अनेकदा काही वर्षांनंतर संबंधित पालक मूल सांभाळण्यासाठी सक्षम असल्याचे समोर येते, तेव्हा त्यांना पाल्याला घरी घेऊन जाण्याची सूचना दिल्यास ते नकार देत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे, आपल्या पाल्याला नाशिक शहरातीलच एखाद्या संस्थेत ठेवावे, यासाठीही ते आग्रही राहत आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल पालकांना ‘बालसंगोपन’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जाते; मात्र या पालकांचा हेका कायम राहत असल्याने दिवसेंदिवस शहरातील अनाथांसाठीच्या संस्थांत बालकांची संख्या वाढतच चालली आहे.