नाशिक : संस्थेचे माजी सरचिटणीस दिवंगत माजी आमदार डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनी डॉक्टरांच्या जीवन कार्याविषयीची जाणीव विद्यार्थ्यांना पौर्णिमा पगार यांनी करून दिली, तर विराज दिनकर दांडेकरने डॉक्टरांच्या वेशभूषेत उपस्थित होऊन ‘मी डॉक्टर बोलतो’ या विषयावर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, तर वर्षा ठाकरे यांनी डॉ. प्राची पवारांचा परिचय करून दिला. प्राची पवारांनी डोळ्यांचे आरोग्य, थ्री डायमेन्शन नजर, सात ते साडेसात वर्षांपर्यंत वाढ, मोतीबिंदू नेत्रदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून, आहारात शेवगा, गाजर, पपईचा समावेश करणे, तसेच पालकांच्या डोळ्यांविषयी असलेल्या शंकांचे निरसन केले. स्मृतिदिनप्रसंगी एनटीएस-वन गुणवत्ता यादीतील गुणवंत ४१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळा साहित्य खरेदीवर सायकल भेट योजनेअंतर्गत ज्योती स्टोअर्सतर्फे तीन विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली.
‘आरोग्य आपल्या डोळ्यांचे’ या विषयावर पालकांचे उद्बोधन
By admin | Updated: October 11, 2015 22:31 IST