शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:44 IST

सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनचांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योजक राधाकिसन चांडक, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, सिन्नर संकुल प्रमुख श्रीपाद देशपांडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, वैशाली गोसावी आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.चांगले शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, त्यातून मातीतले भावविश्व समृद्ध होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या इमारती उभ्या राहतात. ज्ञानाची भूकही इंटरनेटवरूनही भागवता येते. मात्र त्यातून पुस्तकी ज्ञान असलेले साचेबद्ध विद्यार्थी तयार होतात. मात्र संस्कार करणारे, चांगले आणि वाईटाला फरक समजावणारे व जीवनमूल्य शिकविणारे शिक्षक गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. जीवनमूल्य शिकविणाऱ्या संस्था व शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी संस्थेच्या शतकीय वाटचालीचा आढावा घेतला. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद देशपांडे यांनी आभार मानले. ज्ञानदानाचे कार्यउद्योजक राधाकिसन चांडक यांनी संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना आणखी १० लाख रुपयांची देणगी घोषित केली. डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्था संस्कारक्षम, सदृढ वातावरणात ज्ञानदानाचे कार्य करत असल्याचे सांगून सिन्नरकरांनी त्यास बळ द्यावे, असे आवाहन केले.