ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील माध्यमिक विद्यामंदिरच्या खोल्यांची पावसाळ्यापूर्वीच डागडुजी करावी, अशी मागणी शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षी येथील शाळेच्या वर्गखोल्यांना पावसाळ्यात गळती लागल्याने मुलांना पावसाळ्यात बसण्यासाठीदेखील जागा नसल्याने व वारंवार संस्थेकडे तक्रार करूनदेखील दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले; मात्र त्यावेळी शिक्षक व संस्थेचे प्रतिनिधी यांनी मध्यस्थी करून तात्पुरता प्लॅस्टिक कागद खरेदी करून नंतर खोल्यांची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. मात्र उन्हाळा संपत आला तरीदेखील संस्थेने या वर्गखोल्यांकडे लक्ष न दिल्याने अखेर येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. मागील वर्षी २६ जुलै २०१३ रोजी लोकमतने राजापूर शाळेच्या वर्गखोल्यांना गळती अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संस्थेचे संचालक मंडळाने तातडीने राजापूर येथे देऊन वर्गखोल्यांची पहाणी केली. त्या गोष्टीला बराच कालावधी झाला. अद्यापपर्यंत दखल न घेतल्याने पालकांनी शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, संस्थेचे अध्यक्ष व सदस्य यांना पाठविले आहे. निवेदनावर पालक संघाचे उपअध्यक्ष शंकर अलगट, लक्ष्मण घुगे, अशोक आव्हाड, नवनाथ वाघ, अरुण भोकरे, अशोक जाधव आदि ग्रामस्थांच्या सा आहेत.व्ही.ए. नाईक शिक्षण संस्थेच्या जिल्हाभर अनेक शाखा असून, या शाखेत संचालक व शिक्षक यांचे एकमेकांबरोबर नातेगोते असून, शिक्षकावर मुख्याध्यापकाचा कुठलाच वचक राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकजण बदली एका ठिकाणी काम दुसर्याच शाळेवर अशा प्रकारे करत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, मुख्यध्यापकाची बदली करावी तरच गुणवंत विद्यार्थी घडतील.लक्ष्मण घुगेअध्यक्ष, शिक्षक-पालक संघ
शाळेच्या गळक्या खोल्या दुरुस्तीसाठी पालकांचे निवेदन
By admin | Updated: May 7, 2014 21:31 IST