शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शहरात होणार बसपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:13 IST

गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या बसपोर्टप्रमाणेच आता महाराष्टÑातही प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्याची राज्य सरकारची योजना असून, मेळा बसस्थानकात होणाºया बसपोर्टच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे. केवळ बसपोर्टच नव्हे तर पुण्यातील स्वारगेट येथे इंटिग्रेडेट बसस्थानक तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक : गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या बसपोर्टप्रमाणेच आता महाराष्टÑातही प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्याची राज्य सरकारची योजना असून, मेळा बसस्थानकात होणाºया बसपोर्टच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे. केवळ बसपोर्टच नव्हे तर पुण्यातील स्वारगेट येथे इंटिग्रेडेट बसस्थानक तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विमानतळाच्या धर्तीवर मेळा स्थानकात बसपोर्ट तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, परिवहन राज्यमंत्री जयकुमार रावल, ग्रामकिास राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदि उपस्थित होते.राज्यात प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देणार असून, त्यासाठीच केंद्र आणि राज्य सरकार एसपीव्ही स्थापन करणार आहे. केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, या एसपीव्हीत केंद्र सरकार गुंतवणूक करतील असे सांगून फडणवीस यांनी ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी हे एस.टी.चे प्रवासी आहेत. त्यांच्या बळावर एस.टी. उभी राहिली. परंतु पूर्वीच्या सरकारला प्रवाशांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्याचा विसर पडला होता. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही काही निर्णय तातडीने घेतले. परिवहनमंत्री हेच एसटीचे अध्यक्ष असले पाहिजे, असा निर्णय घेऊन एसटीच्या विकासाला चालना दिली. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांच्या संदर्भात निर्णय घेताना चालना मिळाली, असे फडणवीस म्हणाले. बसपोर्ट तयार करताना रेल्वेमंत्री प्रभू यांच्या कल्पनेप्रमाणेच बसस्थानकावरच प्रवाशाला सर्व सुविधा मिळाव्यात. भाजीपाल्यापासून किराणामालापर्यंतच्या सुविधा मिळण्याची सुविधा बसस्थानकावरच असेल असे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. खासगी प्रवासी बसेसचे मोठे आव्हान एसटी महामंडळासमोर आहे. खासगी व्यावसायिक ज्याप्रमाणे बसेसेच्या सेवा देतात त्याप्रमाणेच आरामदायी प्रवासी बसेस महामंडळाकडे असतील त्याबाबतचे नियोजन महामंडळाने केलेले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील रेल्वेस्थानके आधुनिक करण्यासाठी प्रयत्न सरू असून, शंभर स्थानकांचे खासगीकरणातून अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई परिसरातील ३६ रेल्वेस्थानकांच्या नूतनीकरणाची कामे सुरू असल्याचे सांगितले. नाशिकच्या शेतकºयांच्या भाजीपाला विक्रीसाठी मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर जागा उपलब्ध करून देण्याची घोेषणाही त्यांनी केली. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले. महामंडळाच्या बसस्थानकांची राज्यात मोठी जागा आहे. या जागांचा उपयोग करून राज्यातील बसस्थानकांचा बसपोर्ट म्हणून विकास केला जाणार आहे. त्यातील पहिल्या ४१ स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. या बसस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सोय-सुविधा असतील. बसपोर्टच्या वरच्या मजल्यावर मिनी चित्रपटगृह केले जाणार असून, त्यामध्ये मराठीच चित्रपटच दाखविले जाणार आहेत. शेतकरी हा एसटीचा अन्नदाता आहे. गेली ६६ वर्षे एसटी ग्रामीण भागात प्रवासी सेवा देत आहे. शेतकºयांसाठी महामंडळाने पाच कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला असून, एस.टी. कर्मचाºयांवर या मदतनिधीचा कोणताही बोजा पडणार नसल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. खासगी प्रवासी वाहतुकीचा प्रश्न असल्याने महामंडळाने राज्यात १५ हजार बसेस खासगीकरणातून चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही रावते यांनी सांगितले. प्रास्ताविक परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह दोअल यांनी केले, तर आभार विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी मानले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या या घोषणाबुलेट ट्रेनला नाशिकला थांबा मिळणार, सव्वा तासात मुंबईला पोहोचणे शक्य.नाशिकमध्ये सीसीटीव्हीसाठी दोन महिन्यांत निविदा मागवणार.स्मार्ट सीटीअंर्तगत तांत्रिक सुविधा, मोफत वायफाय आणि अन्य सेवा.केंद्र सरकार करणार ड्रायपोर्ट, समृद्धीमुळे ड्रायपोर्ट ते जेएनपीटी जोडले जाणार, अडीच तासात पोहोचणार माल.,  खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न; खासगीकरणातून मिळणार आरामदायी प्रवासी बसगाड्या.काळजी नको, दत्तक पुत्राकडे लक्षमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा केली होती. त्यामुळे विरोधकही हाच मुद्दा पुढे करतात. बसपोर्टच्या कार्यक्रमात त्याचा उल्लेख होताच विकास करण्यासाठी नाशिकला दत्तक घेतले आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. नाशिक या दत्तक पुत्राकडे आपले लक्ष असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यातील आठ शहरांमध्ये इंटिग्रेडेट सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळविता येणे शक्य होणार असून, नाशिकच्या वाहतुकीचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. येत्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस यासंदर्भात निविदा मागविण्यात येतील, असे सांगून स्मार्ट सीटीअंतर्गत हे काम करतानाच वेगाचे नियम तोडणाºया चालकांना थेट त्यांच्या घरी दंडाचे चलन येणार आहे. पूररेषेचा प्रश्नही नक्कीच निकालात काढू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.कागदांचीही तपासणीकिशोर सुधारालयाच्या बाजूने नागरिकांना प्रवेश देण्यात आला होता. धातुशोधक चौकटीतून जाणाºया नागरिकांच्या बॅगा तपासताना अगदी खिशातील कागदे तपासणी करून कुठल्या संघटनेचा सदस्य आहे काय याची पडताळणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ इच्छिणाºयांना रोखण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची तपासणी केली.