शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक आणि कौशल्य पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक यांच्यातर्फे ...

नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक आणि कौशल्य पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मेळावे घेणार असल्याचीदेखील माहिती यावेळी दिली. या पुरस्कार प्रदान सोहळ्याअंतर्गत नाशिक जिल्हा जैन समाजातील इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त, बारावीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांसह सनदी लेखापाल, डॉक्टर, अभियंता आणि वकील अशा ७४ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तींचेही वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋ तुजा कांकरिया, राशी लोढा, पार्श्व दुगड, अनुजा बुरड, उत्सव राका, श्रेणिक नहार, मेहुल पारख, प्रेरणा जैन, वृषाली बोरा, रिद्धी कोठारी, सिद्धी पारख, भूषण ओस्तवाल, शुभम संघवी, करिश्मा पारख, ऐश्वर्या ब्रह्मेचा, प्रणीत भटेवरा, निकेत पारख, तेजस संचेती, सौरभ मोदी, दिनेश चोरडिया आदि विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, सुभाषचंद्र बाफणा, राजेंद्र बोरा, बसंतीलाल ललवाणी, मोतीवाल ओस्तवाल, डॉ. कन्हैयालाल कटारिया, रमेश साखला, चंपकलाल पारख, अरुण बुरड, स्वरूपचंद्र भंडारी, हेमंत बोथरा, अ‍ॅड. विद्युलता तातेड, लताबाई लोढा, प्रमिला पारख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कोठारी, सूत्रसंचालन लोकेश पारख, तर आभार मोहनलाल लोढा यांनी मानले. यावेळी जैन बांधव उपस्थित होते.धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचेरमणिकमुनीजी म.सा. यांनी मार्गदर्शन करताना प्रीतिसुधाजी शिक्षण फंड यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असून, भविष्यातही या प्रकारचे उपक्रम कायम राबवायला हवेत हे सांगताना जीवनात शिक्षणाला महत्त्व द्यायला हवे, असे आवाहन केले. जीवनात प्रत्येकाने साधू-संतांच्या दर्शनाचा तसेच व्याख्यानाचा लाभ घेतल्यास जीवनाची योग्य दिशा सापडते. मानवी जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असून, यामुळे आपल्याला सुख-शांती लाभत असल्याचे रमणिकमुनी म.सा. यांनी यावेळी सांगितले.