शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार

By admin | Updated: December 22, 2015 22:04 IST

खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार

खामखेडा : परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, सर्वत्र मजूरटंचाई जाणवत असल्याने परगावच्या मजुरांकडून कामे करून घेतली जात आहेत.पूर्वी बागयती शेती मोजकी असल्याने गावातील स्थानिक मजुरांकडून शेतीची कामे करून घेतली जात असत. काही वेळेस स्थानिक मजुरांनाही कामे मिळत नसे. मात्र वीज आणि पीव्हीसी पाइपामुळे नदीपात्राचे पाणी शेतीसाठी उपयोगात आल्याने बागायती शेतीचा विकास झाला. शेती सपाटीकरण्यासाठी अत्याधुनिक अवजारांचा वापर होऊ लागला. त्यात जेसीबीसारखे यंत्र विकसित झाल्यामुळे जमीन सपाटीकरण लवकर होऊ लागले. उंचसखल भाग सपाट झाल्याने बागायती शेतीचे प्रमाण वाढले. जे मजूर दुसऱ्याकडे शेतकामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. तसेच बाजारात विविध कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. पूर्वी शेतीमध्ये गहू, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असत. अगदी मोजके शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड करीत असत. त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत. परंतु आठ-दहा वर्षांपासून कांदा या पिकाकडे हमखास पैसा देणारे पीक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळाला आहे. चार-पाच वर्षांपूवी कोकणातील आदिवासींकडे कामे नव्हती. त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी शहरात येत असत. परंतु तेही बागायती शेती करू लागल्याने त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे तेही अगदी मोजक्या प्रमाणात शहरात येतात. तेथील खासगी वाहनधारक लवकर सकाळी मजूर ज्या शेतकऱ्याने सांगितले त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतात. काही वाहनधारक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात. (वार्ताहर)