शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

अपघातग्रस्त विद्यार्थ्याने रुग्णालयातून दिला पेपर

By admin | Updated: March 7, 2017 23:41 IST

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील निळगव्हाण येथील अपघातग्रस्त मयूर वाघने गंभीर दुखापतीनंतर दहावीचा मराठी विषयाचा पेपर थेट रुग्णालयात दाखल असताना दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

निळगव्हाण : अपघातात जखमी झालेल्या मयूर वाघचे कौतुकमालेगाव कॅम्प : तालुक्यातील निळगव्हाण येथील अपघातग्रस्त मयूर वाघने जिद्द व चिकाटीच्या जोरावर गंभीर दुखापतीनंतर दहावीचा पहिला मराठी विषयाचा पेपर थेट रुग्णालयात दाखल असताना दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.  तालुक्यातील निळगव्हाणचा हा विद्यार्थी येथील के. बी. एच. शाळेत शिक्षण घेत आहे. दहावीच्या या परीक्षेसाठी मयूर वाघ गेल्या महिनाभरापासून अभ्यास करीत होता. १ मार्च रोजी मयूरचा नामपूर  रस्त्यावर मोटारसायकल अपघात झाला. त्यास त्याला गंभीर मार लागून त्याचा उजवा पाय जायबंदी झाला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केले होते. उपचारादरम्यान उजव्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागली व मांडीमध्ये लोखंडी सळई टाकण्यात आली. ३ मार्चला ही शस्त्रक्रिया झाली; परंतु त्यानंतर मयूरला पूर्ण हालचाली करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात ७ मार्चपासून दहावीच्या परीक्षेची चिंता त्याला सतावत होती. परीक्षा देण्याचा मनोदय त्याने वडील प्रकाश वाघ व आई सीमा वाघ यांना बोलून दाखविला; मात्र अशा अवस्थेत परीक्षेला जाणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरी मयूरची जिद्द बघून त्याच्या  वडिलांनी त्याबाबत प्रयत्न सुरू केले. स्थानिक शाळा, नाशिक शिक्षण विभाग, पुणे बोर्ड यांना विनंती अर्ज केले पण त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. परंतु मयूरच्या प्रबळ इच्छेमुळे कुकाणे, निळगव्हाण केबीएच स्कूलच्या काही शिक्षकांनी व शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला. याबाबत पुणे येथील बोर्डाचे उपसचिव माळवाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन काही अटी-शर्तींवर मयूरला शाळेमध्ये परीक्षेला येत  नसल्याने त्यास थेट रुग्णालयातूनच पेपर लिहिण्यास परवानगी दिली. सोमवारी (दि. ६) सायंकाळी याबाबतचे आदेश शाळा प्रशासनाला प्राप्त झाले व मयूरला हॉस्पिटलमध्येच एक पर्यवेक्षक व पोलिसांच्या उपस्थितीत पेपर लिहिण्याला परवानगी मिळाली. आज पहिला मराठीचा पेपर मयूरने पूर्ण लिहिला. यापुढील सर्वच  पेपर मयूर रुग्णालयातून देणार  आहे. (प्रतिनिधी)