शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीपात्राला पानवेलींचा पुन्हा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:03 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासन उदासीन : परिसरात दुर्गंधीसह जलचरांचे अस्तित्व धोक्यात

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.तीन ते चार वर्षांपासून नांदूरमध्येश्वर ते माडसांगवी या सुमारे ३० किलोमीटरपर्यंतच्या गोदावरी नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. या पानवेली नवीन चांदोरी-सायखेडा पुलाजवळ अडकून राहतात.त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याचा प्रवाह संथ झाल्याने पानवेली एकाच ठिकाणी अडकून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यामुळे प्रशासनाने त्या पानवेली मोकळ्या करून पुढे काढून देण्याचे काम केले; मात्र पुढे जाऊन त्या चांदोरी-सायखेडा या जुन्या पुलाला अडकल्या आहेत. या पानवेली नांदूरमध्येश्वर धरणात अडकण्याची शक्यता आहे. सदर पानवेलींची समस्या सोडविण्याची मागणी नागरिक व पर्यटकांकडून केली जात आहेत.चांदोरी येथील गोदावरी पात्रातील पानवेलींची समस्या गंभीर असून, यासाठी पानवेली काढण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे.- वैशाली चारोस्कर, सरपंच, चांदोरीपानवेलीच्या समस्येमुळे नदीमधील जलचरांना धोका पोहचत असून, पाणी दूषित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन गोदावरी नदीचे पात्र पानवेलीमुक्त करावे.- सागर गडाख, नागरिक

टॅग्स :nifadनिफाडgodavariगोदावरी