शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जोगलटेंभी परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Updated: August 9, 2015 23:36 IST

मुक्त संचार : एक वासरू, शेळी ठार

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील जोगलटेंभी शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू व एक शेळी ठार झाल्याची घटना घडली. या परिसरात बिबट्याचा नियमित मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. येथील कमोद वस्तीवर भास्कर कालिदास विधाते यांचे घर आहे. राहत्या घराला लागूनच असलेल्या पडवीत विधाते यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे बैलांसह गाय व वासरू बांधले होते. मध्यरात्री जनावरांच्या हंबरण्याने विधाते कुटुंबीय जागे झाले. ते घराबाहेर आले असता बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, खोलवर जखमांमुळे वासराला आपले प्राण गमवावे लागले. शुक्रवारी पहाटे पुन्हा बिबट्याने याच परिसरातील साहेबराव कारभारी पिंपळे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला. पिंपळे यांच्या घरासमोरील पटांगणात सुमारे १५ शेळ्या दावणीला बांधल्या होत्या. त्यापैकी एक शेळी बिबट्याने उचलून नेत तिचा फडशा पाडला. जोगलटेंभी शिवारात बिबट्याचा संचार नेहमीचाच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकांना त्याने दिवसाही दर्शन दिल्याने शेतात काम करण्यास शेतकरी व मजूर धजावत नसल्याचे चित्र आहे. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)