शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मोबाइल स्नॅचिंगचे प्रमाण वाढल्याने दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल घेऊन पळणे, दुचाकीस्वारच्या शर्टच्या वरच्या खिशातील मोबाइल लांबवणे, निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने ...

रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल घेऊन पळणे, दुचाकीस्वारच्या शर्टच्या वरच्या खिशातील मोबाइल लांबवणे, निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने हे चोर स्पोर्ट्स बाईक घेऊन येतात आणि बोलणाऱ्याच्या हातातील मोबाइल अचानकपणे हिसकावून घेत क्षणार्धात रस्त्यावरून पसार होतात. दिवसा किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी चालताना मोबाइलवर बोलत जात असाल तर सावधान. शहरात अशा पायी चालणाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेणारी टोळी सक्रिय आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे रात्रीचा अंधार आणि रस्त्यावरील शुकशुकाटाचा फायदा घेत चोरीचे कृत्य करीत आहेत. निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने हे चोर स्पोर्ट्स बाईक घेऊन येत, बोलणाऱ्याच्या हातातील मोबाइल अचानकपणे हिसकावून घेत आणि क्षणार्धात रस्त्यावरून पसार होत असत.

स्पोर्ट्स बाईकवरून करतात चोरी, चाळीसगाव फाटा, सोमवार बाजार, चौफुली, सौंदाणे शिवार, मुंबई-आग्रा हायवे, बस स्टॅण्ड परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणात मोबाइलवर हात मारला जात आहे. या रस्त्यात मोबाइलवर बोलत जात असणाऱ्या एकट्या व्यक्तींना हेरून अचानकपणे त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतले जातात, तसेच दुचाकीस्वाराच्या शर्टच्या वरच्या खिशातून मोबाइल हिसकावले जात आहेत.

काल गुरुवारी मालेगाव येथील ‘लोकमत’चे वसीम इकबाल शेख यांचा सौंदाणे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर बाईकवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चौदा हजार रुपये किमतीचा रेडमी नोट नाईन मोबाईल चालू दुचाकीवर वरच्या खिशातून लांबवला. क्षणात झालेल्या चोरीमुळे वसीम काहीही करू शकले नाहीत. चोरटे क्षणात पसार झाले. दुसऱ्या एका घटनेत सोयगाव येथील भूषण अहिरे हे संध्याकाळी पायी फिरत असताना चोरट्यांनी हातातील मोबाइल लांबवला. तसेच सोमवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच मोबाइल चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. जवळपास एक ते दीड लाखाचे मोबाइल आठवडाभरात चोरीस गेले.

चोरी गेलेले मोबाइल हे गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच मालेगावात चोरी मोबाइल विक्रीचे मार्केट जोरात चालू असल्याचे नागरिकांतून चर्चेत आहे. मालेगावी किदवाई रोडवर विक्री होणाऱ्या मोबाइलचे रेकॉर्ड विक्रेत्यांकडे असणे गरजेचे आहे, कारण ते मोबाइल गुन्हेगारी कृत्यात वापरले जाऊ शकतात.

पोलीस प्रशासनाने त्वरित होणाऱ्या मोबाइल चोरीवर आळा बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.