शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच आरक्षण सोडत लांबल्यामुळे पॅनलप्रमुखांची हवा गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:09 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत रणधुमाळी : निवडणूक खर्चासाठी आखडता हात

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वी होणार असे जाहीर झाले होते. त्यामुळे पॅनलप्रमुख व इच्छुक निर्धास्त होते. आपण किंवा आपल्याच गटातील उमेदवार सरपंच होणार या आविर्भावात अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. गावाचा कारभार आपल्या हाती येणार म्हणून काहींनी पैशांची जुळवाजुळवदेखील केली होती. आपल्या पॅनलमध्ये कोणते उमेदवार असावेत, कोण सरपंच व उपसरपंच असावा याचीही निश्चिती करून ठेवली होती. कोणत्या वॉर्डात कोण निवडून येणार, उमेदवारांची मते किती, किती मते बाहेर गेलेली, वॉर्डात किती मते आपली, किती मते विरोधकांना पडतील, विरोधकांचा प्रभाव किती, या सर्व गोष्टींचा अभ्यास पॅनलप्रमुखांनी दोन महिन्यांपासून केला होता. मात्र, सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याचे जाहीर केल्याने पॅनलप्रमुख थंडगार पडले आहेत.आता निवडणूक लढताना खर्च कोणी करायचा, हा मोठा प्रश्न उमेदवारापुढे उभा राहिला आहे. आरक्षणामुळे पॅनलप्रमुख द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे पॅनल करतानाही अनेकजण आता डळमळीत होताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेले अनेक कार्यकर्ते सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिरमुसले असून, पुन्हा तेच आरक्षण निघते की नव्याने दुसरे आरक्षण काढण्यात येते, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधितांकडून खर्चाबाबत आखडता हात घेतला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.गावगाड्यातील गप्पा रंगल्या सोशल मीडियावरग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गाव विकासाचा गंध नसणारेही सध्या विकासाच्या गप्पा मारताना दिसत आहेत. अनेक युवक सोशल मीडियावर टीका-टिप्पणी करीत आहेत. अशा लोकांना जनता किती थारा देईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत