शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथ समाधी संस्थान अध्यक्षपदी पंडित कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:41 IST

येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.समाधी संस्थानच्या सोमवारी झालेल्या बैठकीत वादळी चर्चेनंतर सर्वानुमते एका विशिष्ट मुदतीवर ही नियुक्ती झाल्याचे विश्वस्त मंडळातर्फे सांगण्यात आले. यावेळी संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पंढरपूरवारीसाठी पालखी सोहळाप्रमुख म्हणून आतापर्यंत सहायक पालखी सोहळाप्रमुख म्हणून काम पाहणारे पुंडलिक थेटे यांची पालखी सोहळाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.संत निवृत्तिनाथ समाधी विश्वस्त मंडळाची नियुक्ती नाशिक धर्मादाय आयुक्तांनी २० जून २०१५ रोजी केली आली. पहिल्या अध्यक्षपदाचा मान त्र्यंबकराव गायकवाड यांना मिळाला होता. त्यानंतर १७ जानेवारी २०१७ रोजी गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज धोंडगे यांची निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत संपल्यानंतरदेखील तब्बल सव्वा दोन वर्षांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एका विशिष्ट मुदतीसाठी पंडितराव कोल्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.दरम्यान या विशेष बैठकीसाठी मावळते अध्यक्ष संजय धोंडगे, पवन भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाणे, पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, जिजाबाई लांडे, ललिता शिंदे, धनश्री हरदास, योगेश गोसावी, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व सचिवपदाची निवड झाल्यानंतर यावेळी सर्वप्रथम मावळते अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी नूतन अध्यक्ष व सचिवांसह त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम