शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत अनधिकृत दुकाने हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:51 IST

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे.

ठळक मुद्देमेरी रासबिहारी लिंकरोडवर कारवाई

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे.मेरी रासबिहारी लिंकरोडवर असलेल्या एका खासगी प्लॉटवर गेल्या अनेक वर्षांपासून जागामालकाने भाडेतत्त्वावर अनधिकृत दुकाने थाटण्यास परवानगी दिली होती त्यानुसार पंचवीस ते तीस दुकानदारांनी दुकाने थाटून अनधिकृतपणे बांधकाम करत व्यवसाय थाटलेले होते. सदर जागेचा नकाशा व कोणत्याही प्रकारचा लेआउट मंजूर झालेला नव्हता तसेच महापालिका प्रशासनाचीदेखील संबंधित जागामालकाने कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. सदर बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकानांचे बांधकाम हटविण्याची कारवाई केली. शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम केलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले. मुख्य रस्त्याला लागूनच व्यावसायिकांची दुकाने थाटलेली होती. याठिकाणी फरसाण कारखाना, टायर दुकान, भंगार विक्रेते, रोलिंग शटर्स आदींसह विविध प्रकारची दुकाने अनधिकृतपणे उभारलेली होती. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दुकाने थाटल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.(फोटो आरवर ११ पंचवटी नावाने)