पंचवटी : महापालिका प्रशासनाने केरकचरा जमा करण्यासाठी संपूर्ण शहरात ठेकेदारी पद्धतीने घंटागाडी योजना सुरू करून अनेक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही पंचवटीतील काही भागात घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत अनियमित घंटागाडी येत असल्याची तक्रार पंचवटी प्रभागाचे सभापती रुचि कुंभारकर यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनियमित येणाऱ्या घंटागाडीबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल कुंभारकर यांनी केला आहे. प्रशासनाने ज्या ठेकेदाराला कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे त्या ठेकेदाराकडून वारंवार चुका केल्या जात असल्या तरी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कुंभारकर यांनी केला आहे. (वार्ताहर)
पंचवटीत घंटागाडी अनियमित
By admin | Updated: July 26, 2016 00:16 IST