चौकट===
मुख्य अधिकाऱ्यांचे अभिनंदनाचा ठराव
पंचायत राज समितीसमोर जिल्हा परिषदेने कामकाजाचे सादरीकरण केले. त्यात जिल्ह्यात एक मूठ पोषण योजना राबवून कुपोषणाचे प्रमाण कमी केल्याबद्दल समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महिला व बाल विकास अधिकारी दीपक चाटे यांचे अभिनंदन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
चौकट====
तालुका मुख्यालयी धाकधूक
पंचायत राज समिती शुक्रवारी (दि.२७) रोजी तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी व आढावा घेणार असल्याने पंधराही तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. समिती सदस्यांकडून तालुक्यांचे वाटप करण्यात आले असून, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा, शिक्षक, पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही कुचराई होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने साऱ्यांची धाकधूक वाढली आहे.