शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी, राज्यराणी, गोदावरीला ‘इंटरसिटी’ दर्जा

By admin | Updated: February 2, 2017 01:26 IST

महाप्रबंधकांचा निर्णय : निर्धारित वेळेत चालविण्याची प्रशासनावर जबाबदारी

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांसह व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पंचवटीसह गोदावरी व राज्यराणी या तिन्ही रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी इंटरसिटीचा दर्जा दिल्याचे मंगळवारी (दि.३१) जाहीर केले. यामुळे या तिन्ही गाड्या निर्धारित वेळेत चालविण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर आली असून, नाशिककरांना दिलासा मिळणार आहे. मनमाड जंक्शनवरून नाशिकरोडमार्गे मुंबईला दररोज ये- जा करणाऱ्या पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या सुपर फास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना विविध कारणास्तव विलंब रेल्वे प्रशासनाकडून केला जात होता. तसेच अनेकदा कसारा किंवा इगतपुरीजवळ दुरांतो एक्स्प्रेसमुळे अनेकवेळा पंचवटीला साइड ट्रॅक करण्यात येत होते. यामुळे निश्चित वेळेत नाशिककरांच्या हक्काच्या असलेल्या तीनही रेल्वेंना मुंबईत पोहचण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. परिणामी चाकरमान्यांसह व्यावसायिक वर्गाला निर्धारित वेळेत मुंबईत दाखल होता येत नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच अनेकदा प्रवाशांनी पंचवटीला होणाऱ्या विलंबामुळे आंदोलनेदेखील नाशिकरोड, इगतपुरी व मनमाड येथे केली आहेत. सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढली जावी, यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजीव फोकणे यांनी महाप्रबंधक शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. तीनही गाड्यांना ‘इंटरसिटी’चा दर्जा मिळाल्यास निर्धारित वेळेत या गाड्या धावतील, असे मत निवेदनामध्ये मांडण्यात आले होते. एकूणच या तीनही गाड्यांना इंटरसिटीचा दर्जा दिल्याने आता निर्धारित वेळेमध्ये या गाड्या धावणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)