शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी पोलीस ठाण्याचे पालटले रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:39 IST

पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे.

पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. गत जुलै महिन्यातील शुक्रवार, दि़ २८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यातील दुरवस्थेबाबत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाणे हेच का? या आशयाचे वृत्त प्रसारित केले होते़ या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, पोलीस ठाण्याचा आवार चमकू लागल्याने पोलीस कर्मचाºयांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़आयएसओ मानांकन प्राप्त पंचवटी पोलीस ठाण्याची काही दिवसांपूर्वी दुरवस्था झाली होती़ पोलीस ठाणे आवारातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांमुळे पोलीस ठाण्याचा फलकही रस्त्यावरून दिसेनासा झाला होता़ तसेच पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त कार, पोलीस ठाणे आवारात पसरलेला पालापाचोळा यामुळे पोलीस ठाण्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते़ याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसारित केले होते़ लोकमतमधील वृत्त तसेच पोलीस आयुक्तांनीही अपघातग्रस्त वाहने हटविण्याबाबत केलेल्या सूचनांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दखल घेऊन संपूर्ण पोलीस ठाण्याच्या आवाराची साफ सफाई, झाडांचा साचलेला पालापाचोळा तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात व बाहेर उभ्या असलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम करून पोलीस ठाण्यातील बगीचा व कारंजाची सफाई करण्याचे काम करून घेतले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे रस्त्याने जातानाही न दिसणारे फलक स्वच्छ करण्यात आले असून, थेट रस्त्यावरूनही पोलीस ठाणे सहजपणे दृष्टिक्षेपास पडते़ गत सलग चार ते पाच दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या साफसफाईचे काम सुरू होते़ पोलीस ठाणे आवारातील धूळखात पडलेली ग्रीन जीमही स्वच्छ करण्यात आली आहे़