शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस आज रद्द

By admin | Updated: June 25, 2017 00:29 IST

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रविवारी सकाळ-पासून सहा तासांचा मेगाब्लॉक असल्याने मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी सकाळ-पासून सहा तासांचा मेगाब्लॉक असल्याने मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून सुटणाऱ्या व जाणाऱ्या १३ रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावणार आहेत. ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या सहा लाईनवर पुलावर गर्डर बसविण्याचे काम  हाती घेण्यात आल्याने रविवारी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत ६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पादचारी पुलाच्या कामाकरिता ४.३० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. हावडा-मुंबई एक्स्प्रेस ही तिच्या साडेअकराच्या निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने दुपारी २ वाजता, राजेंद्रनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळ साडेअकरा ऐवजी दुपारी २ वाजता, गोरखपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वाबारा ऐवजी दुपारी २.२० वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वा बारा ऐवजी दुपारी १.४५ वाजता, वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी २ वाजता, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस निर्धारित वेळ दुपारी १.३० ऐवजी ३.३० वाजता, वाराणसी-सीएसटी मुंबई महानगरी एक्स्प्रेस दुपारी सव्वादोन ऐवजी ३.४५ वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ३.४५ वाजता, पाटलीपुत्र एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ४ वाजता मुंबईला पोहचणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ही रविवारी सकाळी निर्धारित वेळ १०.५५ ऐवजी १२ वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.१० ऐवजी १२.१५ वाजता, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.०५ ऐवजी ११.५० वाजता मुंबईहून सुटणार आहेत. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहूननागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी सकाळी साडेसात वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर टर्मिनेट केली जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून नागपूरला रवाना होणार आहे.