शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेस होणार ‘आदर्श ट्रेन’; रेल परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

: रेल परिषदेकडून पंचवटी एक्स्प्रेस २ आॅक्टोबरपासून आदर्श ट्रेन म्हणून घोषित केली जाणार आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वेच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकिटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नाशिकरोड : रेल परिषदेकडून पंचवटी एक्स्प्रेस २ आॅक्टोबरपासून आदर्श ट्रेन म्हणून घोषित केली जाणार आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वेच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकिटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  याबाबत रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सांगितले की, यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना १५ आॅगस्टला परिषदेने पत्र लिहिले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना वरील जाचापासून मुक्ती दिली जाणार आहे. एखादी रेल्वे गाडी अशा पद्धतीने आदर्श ट्रेन म्हणून ओळखली जाण्याचा रेल्वेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग आहे.  या गाडीतून फुकटे प्रवासी व चोरांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष पथक नेमण्याची विनंती रेल परिषदेने रेल्वेला केली आहे. मनमाड ते नाशिक व इगतपुरी ते कल्याण दरम्यान ही पथके कारवाई करतील.  २००९ साली रेल्वे परिषदेने आदर्श कोच ही संकल्पना राबवली. या कोचमध्ये पासधारकच असतात. गाडी सुरू झाल्यावर त्यांना आराम मिळावा म्हणून कोणी कोणाशी संवाद साधत नाही की मोबाइल सुरू करत नाहीत. वीज बचतीसाठी दिवे बंद केले जातात. गाडीत प्रथमोपचार पेटी आहे. प्रवाशांना पुस्तक वाचण्यासाठी वेगळा वेळ दिला जातो. फेरीवाले, भिकाºयांना कोचमध्ये प्रवेश नसतो. २०१३ साली या कोचमध्ये छोटेखानी विवाह समारंभ झाला. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली. कोचच्या स्वच्छतेबाबतही २०१२ साली नोंद झाली होती. २०१५ साली या कोचच्या प्रवाशांनी रेल्वेला १०० पत्रे दिली. प्रत्येक पत्राला पोच मिळाली. त्याबदलही लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. प्रवाशांच्या सहभागाने पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा एकदा नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आली आहे. रेल्वेच्या उत्पन्नासाठी आणि गाडीच्या स्वच्छतेसाठी एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ असून रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्र्यांनीदेखील संघटनेच्या या मोहिमेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे येत्या आॅगस्टपासून पंचवटी एक्सप्रेस विक्रमाच्या मार्गावर धावणार आहे.गांधी जयंतीपासून होणार सुरुवातआदर्श कोच असा किताब मिरविणारी पंचवटी एक्स्प्रेस ही संपूर्ण रेल्वेगाडीच विक्रमाच्या दिशेने धावणार आहे. गांधी जयंती म्हणजेच २ आॅक्टोबरपासून पंचवटी एक्स्प्रेसची काळजी रेल परिषद घेणार आहे. संपूर्ण पंचवटी एक्स्प्रेसचे डबे हे एकाच रंगाचे असणार असून या गाडीमध्ये एकही विना तिकीट प्रवासी प्रवास करणार नाही याची काळजी रेल परिषदेचे स्वयंसेवक घेणार आहेत. रेल्वे प्रशासनाचे तिकीट निरीक्षकांची टीम या स्वयंसेवकांना मदत करणार आहे. एकूण प्रवाशांच्या केवळ ४० टक्के इतकेच उत्पन्न पंचवटी एक्स्प्रेसमधून मिळते. हे उत्पन्न १०० टक्के करण्याचा निर्धार रेल परिषदेने केला आहे. शिवाय या गाडीतून एकही भिकारी प्रवास करू शकणार नाही, अशी काळजी घेतली जाणार असून स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सांगितले.