शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

...अखेर पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडले

By admin | Updated: August 20, 2016 00:36 IST

...अखेर पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडले

 येवला : पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार पाणीटंचाई म्हणून पालखेडच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून शुक्र वारी दुपारी १ वाजता पाणी सोडले.पालखेड डाव्या कालव्यास ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे यासाठी शिवसेनेने उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. थेट महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडेच हा प्रश्न उपस्थित केला होता. येवल्याचे पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसत असतानाच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिष्टमंडळाच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांना पाणीटंचाई म्हणून येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. येवल्याला पालखेडचे पाणी रविवारी पोहोचणार आहे. पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडावे यासाठी १४ आॅगस्टपासून शिवसेनेने येवल्याच्या पालखेड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पाणी सोडल्याशिवाय उपोषण सुटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी थेट निवासी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना याप्रश्नी तत्काळ लक्ष घालण्यास सांगितले. उपोषणकर्त्यांशीही चर्चा केली. नाशिक येथे १५ आॅगस्टला शिवसेनेच्या शिष्टमंडळाची जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन, निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी कान्होराज बगाटे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांच्यासह उपोषणकर्ते शिवसेना नेते संभाजी पवार, सेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, साहेबराव सैद, शरद लहरे, अरुण काळे, धनंजय कुलकर्णी, रवि काळे, रतन बोरनारे, छगन अहेर, नाना पाचपुते यांनी चर्चेत भाग घेतला. लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे पिण्याच्या पाण्याची मागणी पंचायत समितीकडे करावी, असेही ठरले होते. ठरावानुसार पाणी सोडण्याचे आश्वासन शिवसेनेला दिले होते. पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रांतील टेलची चारी क्र मांक ५२ ला सर्वप्रथम पाणी देऊन बंधारे भरले जातील. यानंतर टप्प्याटप्याने बंधारे भरण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी सांगितले. (वार्ताहर)