शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघात ‘पालघर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:18 IST

पालघर निवडणूक विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

नाशिकरोड : पालघर निवडणूक विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.  नाशिक शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिकेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोटवाणी रोड उत्सव मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, पालघर निवडणूक म्हणजे भाजपाचे नवीन व्हर्जन आहे. पालघर व्हर्जनचा पुरेपूर वापर शिक्षक निवडणुकीत करून घेतल्यास आपण विजयी नक्की होऊ असे महाजन यांनी स्पष्ट केले. पालघर निवडणुकीत प्रतिकूल परिस्थती असतानाही विजय खेचून आणला. या ठिकाणी जर अनुकूल परिस्थिती असून, आपल्या संघटन पातळीवर प्रचार करून शिक्षक मतदारसंघ जिंकावाच लागेल. विधान परिषदेत बहुमताची गरज असल्याने भाजपाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे निवडणूक असल्याने चांगले नियोजन करून ही निवडणूक जिंकावी लागेल, असे आवाहन महाजन यांनी केले.  राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शिक्षक व संस्थांना आपले प्रश्न भाजपा सोडवेल असा विश्वास आहे. वरच्या सभागृहात बहुमतासाठी तंत्र शुद्ध नियोजन करून या निवडणुकीत विजय मिळवावा लागेल, असे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले. यावेळी उमेदवार अनिकेत विजय नवल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, महापौर रंजना भानसी, मनपा स्थायी सभापती हिमगौरी आहेर, उदय वाघ, बबन चौधरी, भानुदास बेरड, दिनकर पाटील, संभाजी मोरुस्कर आदींसह पाच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.गेल्या चार वर्षांत सत्तेत असल्याने जनहितार्थ अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. मात्र राज्यसभेत विरोधी पक्ष काँग्रेसकडे बहुमत असल्याने आपल्या निर्णयाची अमंलबजावणी उशिराने झाली. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी शिक्षक मतदारसंघात सर्वांनी एकदिलाने काम करून यश मिळावावे.  - जयकुमार रावल,  पर्यटन राज्यमंत्री

टॅग्स :Electionनिवडणूक