शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्णनगरला पालखीची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:32 IST

श्रीकृष्णनगर येथील कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला.

पंचवटी : श्रीकृष्णनगर येथील कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला. फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात येऊन जन्म साजरा करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले.श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्ताने शनिवारी सायंकाळी श्री कृष्णनगर कृष्णमंदिर येथून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. कृष्णमंदिर येथून निघालेली पालखी टकलेनगर, कृष्णनगर उद्यान, गणेशवाडी भागातून काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. पालखीचा कृष्णमंदिरात समारोप करण्यात आला. शनिवारी सकाळी श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले. सायंकाळी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम झाला. रात्री महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मच्छिंद्र सानप, श्रीकृष्ण महाशद्बे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते.गेल्या मंगळवारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती. दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. गुरुवारी अन्नकोट प्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला, तर शुक्रवारी सकाळी ७ वाजता पवमान अभिषेक, श्रींची महापूजा व आरती, गीत पाठ, रात्री हरिप्रिया कृष्णलीला धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीNashikनाशिक