शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या प्रचाराने रंगत

By admin | Updated: March 23, 2017 00:58 IST

नाशिक : चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली आहे.

नाशिक : चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली आहे. या निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या जनस्थान या कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या पॅनलने बुधवारी (दि. २२) आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. जनस्थान या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असलेल्या अभय ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणातील जनस्थान पॅनलच्या उमेदवारांनी बुधवारी सकाळी ग्रामदैवत कालिका देवीचे दर्शन घेऊन टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे शहरातील साहित्यिकांच्या मार्गदर्शनाने निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने आपले पहिले पाऊल टाकले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलेचे नऊ रंग असणाऱ्या लेखक, साहित्यिक आदिंबरोबर प्रत्येक उमेदवाराने प्रचारास सुरुवात केली आहे. प्रचार उद्घाटनादरम्यान जनस्थान पॅनलमधील उमेदवारांसह नरेश महाजन, श्याम पाडेकर, आनंद ढाकीफळे, बाबा आदम मुल्ला, जावेद शेख, प्राजक्त देशमुख यांच्यासह जनस्थान ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.  या निवडणुकीतील अन्य ‘ग्रंथमित्र पॅनल’ कडून गुरुवारी (दि. २३) प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या आवारात ग्रंथपूजनाने या पॅनलच्या प्रचारास सुरुवात करण्यात येणार आहे. प्रचाराला प्रारंभ झाला असला तरी सोशल माध्यमातून जोर धरलेल्या प्रचाराने निवडणूक चिन्ह आणि अनुक्रमांक प्राप्त झाल्यानंतर मात्र उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता यावे यामागणीसाठी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर बुधवारी (दि. २२) वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी धर्मादाय आयुक्तांना दि. ९ आणि २० मार्च रोजी सादर केलेल्या अर्जांची वेगवेगळी सुनावणी करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकरणी आता शुक्रवारी (दि. २४) धर्मादाय आयुक्तांकडून निर्णय येणे अपेक्षित आहे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी बुधवारी (दि. २२) धर्मादाय आयुक्तालयात उपस्थित राहून आपले म्हणणे शुक्रवारी लेखी स्वरूपात सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)समित्यांना पुरविली बनावट कागदपत्रेसार्वजनिक वाचनालयाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने वाचनालयातील व्यवहारांची चौकशी करण्यात यावी यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर अध्यक्ष असलेल्या समितीची नेमणूक केली परंतु वाचनालयाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीचा अहवाल निव्वळ औरंगाबादकरांच्या सोयीचा नसल्याने त्यांनी फेटाळला असल्याचे मत मिलिंद जहागिरदार यांनी व्यक्त केले आहे. गोरवाडकर समितीला पुरविण्यात आलेली अनेक कागदपत्रे ही बनावट, मागील तारखा टाकून केलेली तसेच संबंधितांच्या सह्या नसलेली, आवक जावक क्रमांकांमध्ये खाडाखोड असलेली कागदपत्रे उघडकीस आल्याचेही जहागिरदार यांनी म्हटले आहे. गोरवाडकर समितीच्या अहवालाबरोबर त्याच्याशी संबंधित इतर कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली असून, गोरवाडकर समितीच्या ज्या बैठका झाल्या त्याची इतिवृत्ते असून, या इतिवृत्तांचा अभ्यास केल्यावर औरंगाबादकरांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे तसेच हा खोटारडेपणा समितीने अधोरेखित केला आहे. औरंगाबादकरांच्या भोळ्या भाबड्या मुखावट्यामागील कारस्थानी चेहरा आता समोर आला आहे आणि यापुढेही अनेक खोट्या गोष्टी समोर येणार आहेत.  - मिलिंद जहागिरदार, माजी कार्यवाह, सावाना