शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:46 IST

धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले़

नाशिक : धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यां गांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले़  गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्समध्ये आयोजित दोनदिवसीय सातव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी कांबळे बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, निसर्ग केवळ वेदना देत नाही तर त्याचबरोबर सदृढ मन, तल्लख मेंदू, प्रतिभा व वेदना सहन करण्याची ताकदही देतो़ शरीराने सुदृढ मात्र मनाने पांगळ्या असलेल्यांना दिव्यांग हे दररोज जिंकणाऱ्या लढाईद्वारे प्रेरणा देतात़ त्यामुळे स्वत:चा तिरस्कार न करता अलौकिक प्रतिभेतून साहित्यनिर्मिती करा, असे कांबळे यांनी सांगितले़  संमेलनाच्या अध्यक्षा इंदरजित नंदन यांनी, देशपातळीवरील दिव्यांग साहित्यिकांना भेटण्याची संधी व त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगत अधिकारांप्रती जागरूक असलेल्या दिव्यांगाची प्रचिती आल्याचे सांगितले़ पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात कमी नसून या प्रकारच्या साहित्य संमेलनातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले़ तर नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दोनदिवसीय संमेलनाचा आढावा घेतला़ यावेळी व्यासपीठावर साहित्य व सांस्कृतिक मंडळ पुणेचे अध्यक्ष बापूसाहेब बोभाटे, सचिव नीलेश छडवेलकर, विश्वस्त सुहास तेंडुलकर, संयोजन समितीचे अध्यक्ष सचिन पानमंद, उपाध्यक्ष भावना विसपुते, शारदा गायकवाड, कार्याध्यक्ष सुनील रुणवाल, कार्यवाहक पांडुरंग भोर उपस्थित होते़यशोगाथेतून मिळाली प्रेरणाभारत-पाक युद्धात शरीरात नऊ गोळ्या घुसल्याने अपंगत्व आल्यानंतरही हार न मानता जागतिक जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मुरलीकांत पेटकर यांनी मुलाखतीत आपला जीवनप्रवास उलगडून दाखविला़ तर दिव्यांग असतानाही जिद्दीच्या जोरावर नायब तहसीलदार पदावर काम करणाºया हंसराज पाटील यांची सुनील रुणवाल यांनी प्रकट मुलाखत घेतली़संमेलनातील ठरावएक देश, एक नाव, एक पेन्शन मिळावी (दिव्यांगांना दिल्ली सरकार दोन हजार रुपये, महाराष्ट्र सरकार ६०० तर उत्तर प्रदेश सरकार ३०० रुपये पेन्शन देते़ ) भारत हा एक देश, अंध अपंगांना दिव्यांग हे एक नाव तसेच देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दिव्यांगांना मिळणारी पेन्शनही एक समान असावी़, किमान मूलभूत गरजा पूर्ण करता येतील अशा सुविधा सरकारने दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्याव्यात़दिव्यांग साहित्य संमेलनामध्ये सकाळच्या सत्रात झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनाने कवींनी सादर केलेल्या कवितांनी चांगलीच रंगत आणली़ या कविसंमेलनात दिलशान मेहंदी, उमा देवी (उ.प्र.), पालवेंद्र सिंह (राजस्थान), विकास कुमार, पंकज कुमार (बिहार), सुशीलकुमार (जम्मू-काश्मीर) या कवींनी सहभाग घेतला होता़

टॅग्स :literatureसाहित्य