शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पदन्यासाचा ‘सृजन’ नृत्याविष्कार

By admin | Updated: June 25, 2017 00:35 IST

नाशिक : ‘होरी खेलत हे गिरीधारी’, ‘बाजे रे मुरलीयाँ’ यांसह ठुमरी आणि विविध भजनांवर आधारित भव्य कथक नृत्याविष्कार शनिवारी (दि. २४) रसिकांनी अनुभवला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘होरी खेलत हे गिरीधारी’, ‘बाजे रे मुरलीयाँ’ यांसह ठुमरी आणि विविध भजनांवर आधारित भव्य कथक नृत्याविष्कार शनिवारी (दि. २४) रसिकांनी अनुभवला. निमित्त होते जनस्थान व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सृजन’ या नृत्याविष्काराचे.  प. सा. नाट्यगृह येथे आयोजित ताल, नाद, लय यांचा मिलाफ असलेल्या या ‘सृजन’ या नृत्याविष्कारात विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर यांनी सादर केलेल्या कथक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात सुमुखी अथणी यांनी सादर केलेल्या ‘एक दंत गजाननम्’ या गणेशवंदनेने झाली. यानंतर कीर्ती भवाळकर यांनी ‘वंदे शिवम् सुंदरम्’ या शिववंदनेतून भगवान शंकराला नमन केले, तर विद्या देशपांडे यांनी ‘मे तो एक निरंतर धाऊजी’ या गुरूवंदनेतून आपल्या गुरूं प्रती आदर व्यक्त केला. यानंतर सुमुखी अथणी आणि त्यांच्या शिष्याने ‘सरगम’ या नृत्यातून रसिकांना अनोखी जुगलबंदी अनुभवायला मिळाली. सृजन नृत्याविष्कार उत्तरोत्तर रंगत असताना कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी ‘होरी खेलत हे गिरीधारी’ या होरी नृत्यातून कृष्ण आणि गोपिका यांची क्रीडा रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विद्या देशपांडे यांच्या शिष्यांनी ताल प्रस्तुती पेश केली आणि या नृत्यावर सादर झालेल्या श्रवणीय पदन्यासावर संपूर्ण रंगमंचाने ठेका धरत शिष्यांचा उत्साह दुणावला तसेच यावेळी ‘वेतु बोले आयी मोरा रे’ या कजरी नृत्यातून वरुण राजाला साकडेदेखील घालण्यात आले. यानंतर ‘वृंदावन कुंज भवन’ हे भजन आणि ‘आरोह’ एक नृत्याविष्काराचे सुमुखी अथणी यांनी सादरीकरण केले. विद्या देशपांडे यांनी ‘दक्षयज्ञ’या नृत्याविष्कारातून ‘शिव-पार्वती’ यांच्या जीवनावरील प्रसंग आपल्या नृत्यातून दाखविला. कलाकारांना सुभाष दसककर (संवादिनी), नितीन पवार (तबला), मोहन उपासनी (बासरी), अद्वय पवार, सुनील देशपांडे यांनी साथसंगत केली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जनस्थान महोत्सवाची’ शनिवारी सृजन नृत्याविष्काराने सांगता झाली. सूत्रसंचालन अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले.