नाशिक : महात्मानगर विकास मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. १२) पहाटे ५.३० वाजता ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती मंदिराच्या प्रांगणात ही मैफल रंगणार आहे.कार्यक्रमात गायिका रागिणी कामतीकर यांच्या ‘स्वराजित’ गायन वर्गाचे विद्यार्थी राजेंद्र कौर, नेहा मूर्ती, करण शिंदे, जान्हवी पाटील, मेघना आपटे, खुशी पारख हे भावगीते, पहाटेची भक्तिगीते सादर करणार आहेत. त्यांना प्रमोद पवार, रागेश्री धुमाळ, आदित्य कुळकर्णी, अविनाश गांगुर्डे हे संगीतसाथ, तर मधुवंती देशपांडे निवेदन करणार आहेत, असे बा. पां. सोनार, निर्माण ठाकरे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, छाया ठाकरे, लक्ष्मण सावजी, रंजन ठाकरे आदिंनी कळवले आहे.
महात्मानगर येथे ‘पाडवा पहाट’
By admin | Updated: November 9, 2015 23:15 IST