शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसंत पंचमीनिमित्त पालखी मिरवणूक

By admin | Updated: February 2, 2017 23:12 IST

येवला : देवांग कोष्टी समाजातर्फे विविध कार्यक्रम

येवला : येवला शाहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने बुधवारी माघ पंचमी अर्थात वसंत पंचमी उत्सव निमित्ति सवाद्य सनईचौघडा, उंट, भालदार चोपदार, पालखीसह उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. माघ महिन्यामधील वसंत पंचमी हा सरस्वतीच्या उपासनेचा दिवस आहे अशी मान्यता आहे. पंचमीला सरस्वतीचा उत्सव मोठ्या आनंदाने व जोशाने राज्यभर सादर करण्याची परंपरा आहे. याचाच एक भाग म्हणून येथील माता श्रीचौण्डेश्वरी मूर्तीचा पुन:प्राणप्रतिष्ठा चतुर्थ वर्धापनदिन व वसंत पंचमीचा महोत्सवादरम्यान मंदिर गाभाऱ्यासह परिसरात रोषणाई करण्यात आली. प्रारंभी सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोष्टी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री व सौ. चोल राजेश्वर (हैदराबाद), अनिल बाबर, संजय लोकरे, प्रकाश साकरे, सुरेश असलेकर, दत्तात्रय चेचकर, विजय कलढोणे, पंकज पन्हाळे यांनी सपत्नीक अभिषेक केला आणि पालखी मिरवणुकीला सुरु वात झाली.पालखी उत्सवात यंदा श्रीसाईबाबा यांचा महिमेचा जिवंत देखावा करण्यात आला होता. पालखीचा मान महिलांना देण्यात आला होता. विशेष म्हणजे फेटा घालून महिलांनी पालखी शहर मुख्य मार्गक्रमण केले. मोठा उत्साह तरुणांमध्ये दिसून आला. शहरात पहाडगल्लीत टक्कर गणेश मित्रमंडळ, मेनरोड येथे महेश काबरा पतसंस्था, शिंपी समाज साळी समाज अशा विविध ठिकाणी सडा रांगोळीने स्वागत करण्यात आले. श्रीसाईबाबा यांच्या महिम्याच्या जिवंत देखाव्यात साईबाबांच्या भूमिकेत प्रमोद अवणकर होते. महिलांनी नऊवारी साडी परिधान करून, तर पुरुषांनी भगवी टोपी परिधान केली होती. उत्सवाध्ये देवांग कोष्टी समाजाच्या महिला, युवती तसेच बालके, तरुण वृद्ध लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे श्रीचौंडेश्वरी मातेचा अभिषेक, आरती व मातेचा दुग्धाभिषेक व पुजन करून मातेची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली. पालखीचा मधली गल्ली येथील मंदिरात समारोप करण्यात आला. दरम्यान, अनेक मान्यवरांची यात उपस्थिती होती. कार्यक्रमात कन्यारत्नांना साडी चोळी आणि विविध क्षेत्रांतील समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त मनोज भागवत, आभार संदीप बाबर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे सर्व तरुण मंडळ आणि महिला मंडळांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)