शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेश मंडळांच्या तयारीला वेग

By admin | Updated: September 2, 2016 00:44 IST

फुलली बाजारपेठ : मंडप उभारणीला प्रारंभ; घरगुती उत्सवासाठीही उत्साह

 नाशिकरोड : परिसरामध्ये सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला वेग आला असून, मंडप उभारणीची कामे सुरू झाली आहेत, तर घरगुती सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे.नाशिकरोड, जेलरोड, उपनगरे व आजूबाजूच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘श्रीं’च्या आगमनानिमित्त सर्वत्र लगबग दिसत आहे. बहुतांश मंडळाचे मंडप उभारण्याचे कामं पूर्ण झाले असून, देखावे उभारणीचे काम सुरू केले आहे. तर काही मंडळांचे मंडप उभारणी, रस्त्यावर कमानी, विद्युत रोषणाई लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक सार्वजनिक मंडळाने आपापल्या भागात सजावटीचे काम सुरू केले आहे.बाजारांमध्ये विक्रीस आलेल्या गणरायांची मूर्ती बुकिंगसाठी भाविकांची सहपरिवार गर्दी होऊ लागली आहे. तर घरगुती, सोसायटी, कॉलन्यांमधील छोट्या मंडळाच्या देखाव्यांची साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. विविध रंगांच्या विद्युत रोषणाईच्या माळा, दिवे, प्लास्टिक फुलांचे तोरण, माळा, थर्माकोलचे मंदिर, महिरप, नवनवीन ध्वनीगीतांच्या सीडी बाजारात दाखल झाल्या आहेत. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. (प्रतिनिधी)