शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ओझरच्या उमेशला मिळाले ग्लुकोमावरील औषधाचे पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 14:02 IST

ओझर :- येथील उमेश लढ्ढा या युवकाने डोळ्यांच्या आजारावरील औषधाचे संशोधन करून त्याचे पेटंट मिळवले आहे. उमेशच्या यशाने ओझरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उमेश सध्या भुजबळ नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसी आड गावं येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

ओझर :- येथील उमेश लढ्ढा या युवकाने डोळ्यांच्या आजारावरील औषधाचे संशोधन करून त्याचे पेटंट मिळवले आहे. उमेशच्या यशाने ओझरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उमेश सध्या भुजबळ नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसी आड गावं येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.  उमेश याने फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असतांनाच सन २०१४ मध्ये पेटंट रजिस्टर करून आपल्या नावावर १३ जाने २०२१ रोजी एक पेटंट नोंद केले आहे . उमेशने सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेज ,नऱ्हे कॅम्पस येथून शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच उमेश व त्याचा मित्र डॉ .रोहन बारसे यांनी मार्गदर्शक व उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे व फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ अमोल तगलपल्लेवार यांच्या मदतीने महिना भर पुणे येथील जवळपास ५० नेत्ररोगतज्ज्ञांच्या भेटी घेत डोळ्याला होणारा ग्लुकोमा आजारावर डोळ्यात टाकले जाणारे औषधांबाबत माहिती संकलन केली. त्यानुसार महाविद्यालयातील प्रयोगशाळेत एका औषधाचा शोध लावण्यास सुरुवात केली. सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेज ,नऱ्हे येथील उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे व फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ अमोल तगलपल्लेवार तसेच विद्यार्थी डॉ रोहन बारसे,उमेश लढ्ढा यांना ग्लुकोमा या डोळ्यांच्या आजारावरील उपयुक्त संशोधनबद्दल भारत सरकारने पेटंट मंजूर केले आहे. या संशोधनामुळे ग्लुकोमावरील उपचार कमी मात्रेने औषध वापरून सुद्धा प्रभावीपणे करता येणार आहे. या संशोधनासाठी डॉ कोकरे व डॉ तगलपल्लेवार यांनी वेगवेगळ्या औषध निर्मिती कंपन्यांबरोबर पुढील संशोधन करार केले आहेत.----------------पेटंट प्राप्त संशोधन हे ग्लुकोमासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कमी औषध वापरून सुधा प्रभावीपणे ग्लुकोमाचे उपचार करणे शक्य होणार आहेत. हे संशोधन बाजारात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- प्रा.उमेश लढ्ढा

टॅग्स :Nashikनाशिक