ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एच ए एल गेट क्र मांक एकच्या सर्व्हिस रोडसह समोर महामार्गावरील दोन्ही बाजूकडील दुभाजकात मोकाट जनावरे मोकाटपणे फिरत असतात हे जनावरे महामार्गावर आल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून वेळीच दखल घेऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकासह कामगारांनी केली आहे.महामार्गावरील एचएएल गेट क्र मांक एक अनेक वर्षापासून बंद आहे. या गेट समोरच सर्व्हिस रोड वरून महामार्गावर येण्यासाठी रस्ता आहे. ओझरटाऊनशिप मधून किंवा एचएएल कारखान्यातून ओझरकडे जाण्यासाठी याच सर्व्हिस रोडसह मुख्यरस्त्याचा वापर करतात या गेटसमोर अनेक मोकाट जनावरे बसलेले असतात हेच जनावरे सर्व्हिस रोडवर तर मोकाट फिरतातच व महामार्ग ओलांडून महामार्गावर असलेल्या दुभाजकावर जातात या वेळी पुलावरून वेगाने येणाऱ्या वाहन चालकांना वाहने हळू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ही जनावरे महामार्गावरील दोन्ही बाजूच्या दुभाजकावरून महामार्गावर उतरू शकतात जर हे जनावरे अचानक महामार्गावर आले आणि पुलावरून वेगात येणाºया किंवा टाऊनशिप कडून येणाºया जाणाºया वाहनाच्या चालकास वाहनावर नियंत्रण मिळविण्यास अपयश आले तर लहान मोठा अपघात होऊ शकतो म्हणून वेळीच दखल घेऊन संबंधितांनी या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकासह कामगारांनी केली आहे.चौकटओझर गावाकडून एचएएल कारखान्याकडे जाणाºया सर्व्हिस रोड आणि महामार्गाच्या दुतर्फा मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून वाहन धारकांसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. हे मोकाट जनावर नॅशनल हायवेच्या रस्याच्या मध्यभागी ठिय्या देत असल्याने अपघात होऊ शकतो. या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा.- नितिन पगारे, सामाजिक कार्यकर्ता, ओझर.
ओझरला महामार्गावर मोकाट जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 15:40 IST
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एच ए एल गेट क्र मांक एकच्या सर्व्हिस रोडसह समोर महामार्गावरील दोन्ही बाजूकडील दुभाजकात मोकाट जनावरे मोकाटपणे फिरत असतात हे जनावरे महामार्गावर आल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून वेळीच दखल घेऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकासह कामगारांनी केली आहे.
ओझरला महामार्गावर मोकाट जनावरे
ठळक मुद्देवेळीच बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी