शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओझर : दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्ष हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:47 IST

द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.

ओझर : द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.भारतीय द्राक्ष बाजारात नाशिक जिल्हा सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचे कारण म्हणजे येथील हवामान द्राक्षासाठी पोषक आहे. द्राक्षांना दोन प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत, एक जागतिक आणि दुसरी भारतीय. थंडीमुळे द्राक्षातील साखरेचे प्रमाण घटते. परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने द्राक्षमण्यांची फुगवण क्षमता व गोडी कमी झाल्याने उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणी कमी झाली व उत्पन्नदेखील तीस टक्के घटले. राज्यातून द्राक्ष निर्यात हंगामाचा श्रीगणेशा करणारा पट्टा म्हणून कसमादे पट्ट्याची ओळख आहे. नोव्हेंबरमध्ये नॉन युरोप देशात चांगल्याप्रकारे निर्यात याच भागातील द्राक्षांनी केली. सर्वात जास्त उत्पन्न घेणारा भाग म्हणून या पट्ट्याचा लौकिक आहे; मात्र तेथील बागायतदार मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे डावणीचा प्रादुर्भाव होऊन फुलोºयाची गळ व कुज प्रचंड झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यातून सावरत असताना ऐन माल तयार होत असताना गेल्या आठवड्यात झालेला ओखीचा पाऊस जखमेवर मीठ चोळून गेला आहे. त्यामध्ये तयार झालेल्या द्राक्ष घडांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कसमादे पट्ट्यातील मुख्यत: सटाणा तालुक्यातील नुकसान हे निम्म्याहून अधिक आहे. नाशिक विभागात आॅक्टोबरमधील गोडबहार छाटणीदरम्यान झालेल्या बेमोसमी पावसाने डावणीचा प्रादुर्भाव होऊन घड जिरण्याचे प्रमाण अधिक झाले. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात घडनिर्मिती झाली असून, त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर झाला आहे. एकसारख्या मालाची कमतरता यंदा मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय बाजारातदेखील याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. निर्यातीचा विचार केल्यास यंदा प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडत असल्यामुळे निर्यातक्षम प्रत मिळवणे अवघड ठरत आहे. पाऊस व अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च दुप्पट होत आहे. सर्व बाबींचा विचार करता यंदाचा द्राक्ष हंगाम बागायतदारांना गोड ठरण्याची शक्यता धूसर असल्याचे आजमितीस चित्र उभे राहिले आहे.