शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओझर @ 7.8; थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:08 IST

निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवबिंदंूची बारीक बर्फाची झालर तयार झाली होती.

ठळक मुद्देहुडहुडी भरणाऱ्या थंडीचा द्राक्षबागांना झटका

ओझर : निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवबिंदंूची बारीक बर्फाची झालर तयार झाली होती.कडाक्याच्या थंडीने द्राक्षमालाची फुगवण थांबली आहे, तर पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सदरचे तापमान हे कोणत्याच पिकाला चांगले नाही. या तापमानामुळे द्राक्षबागेत केवळ द्राक्षांनाच नव्हे तर द्राक्षवेलीतील पेशींनाही जखमा होण्याचा धोका आहे. एकीकडे अवकाळी पावसाच्या परिस्थितीने संकटात सापडलेल्या बळीराजा समोरील संकटांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. टंचाईवर मात करणाºया शेतकऱ्यांच्या संकटात आता वाढत्या थंडीने भर टाकली आहे. हुडहुडी भरणाºया थंडीचा बहरलेल्या द्राक्षबागांना झटका बसू लागला आहे.तापमानाचा पारा बराच खाली घसरू लागल्याने बागेतील द्राक्षमणी तडकू लागतानाच द्राक्षांच्या घडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. नाशिक जिल्ह्यात दिवसागणिक तापमानाचा पारा अधिकाधिक खाली येत चालल्याने जनजीवन विस्कळीत होतानाच या कडाक्याच्या थंडीनं प्रताप दाखवायला सुरूवात केली आहे. विशेषत: सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे ओझर परिसरातील द्राक्षबागांवर विपरीत परिणाम करण्यास सुरु वात केली आहे. निफाड तालुक्यात बुधवारपासून तापमान अधिकच खाली घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोरील चिंता अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती