शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या असहकार्यामुळे मालेगावी ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:16 IST

मालेगावला  धुळे येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू होता परंतु धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे आणि नंदुरबारसाठी ऑक्सिजनची गरज असल्याने मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिल्याने मालेगावची ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले.

ठळक मुद्देडाॅ. डांगे यांची स्पष्टोक्ती : नाशिकहून ऑक्सिजन पोहचण्यास विलंब

मालेगाव : मालेगावला  धुळे येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू होता परंतु धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे आणि नंदुरबारसाठी ऑक्सिजनची गरज असल्याने मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिल्याने मालेगावची ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले.याबाबत डॉ. डांगे यांनी नाशिकला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी नाशिक येथून मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करू, असे सांगितले. धुळे येथून ऑक्सिजन मिळत नसल्याने पुरवठा विस्कळीत झाला असून तुटवडा जाणवत आहे. नाशिक येथून ऑक्सिजन मिळण्यास पाच तास लागतात. धुळे कमी अंतरावर असल्याने वेळ वाचतो. यामुळे  असुविधा निर्माण झाली असून धुळे येथून ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी डॉ डांगे यांनी केली आहे.रिकामी सिलिंडर्स कमी आहेत. नाशिकचा वितरक वाहतूक सेवा व मनुष्यबळ देत नाही.  धुळे येथून शासनाने मालेगावसाठी  पुरेशा ऑक्सिजन सिलिंडर्सची व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. किशोर डांगे यांनी केली आहे.ट्रकने करावी लागते सिलिंडरची वाहतूकधुळेतील वितरकाशी सहा महिन्यांपूर्वी करार झाला होता त्याच्याकडून चोवीस तास सेवा मिळत होती. आता नाशिकहून ट्रकने ऑक्सिजन सिलिंडर्स आणावे लागतात. सिलिंडर्सची संख्या २४० इतकी आहे परंतु रोज ३०० ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज आहे. याशिवाय २०० सिलिंडर्सची आणखी गरज आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या