शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत राजकारणाला ‘ऑक्सिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

नाशिक- महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची ...

नाशिक- महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाचा एकतर्फी कारभाराचा निषेध केला आहे.

शहरात कोरोना संक्रमण वाढत असून गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा हा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी मोरवाडी येथील शहरी आरोग्य केंद्र तसेच प्रबोधनकार ठाकरे सभागृह येथील मोकळ्या जागेची पाहणी केली. गंगापूर येथील शहरी आरोग्य केंद्राचीदेखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प साकारल्यानंतर ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर भरून देणे शक्य होणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, अशाप्रकारचे ऑक्सिजन प्रकल्प साकारण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. साथ प्रतिबंधक विशेषाधिकाराचा आयुक्त दुरुपयोग करून एकतर्फी निर्णय घेतात आणि काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा दुर्घटना घडल्यास भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले जाते. प्रशासनाच्या एकतर्फी कारभाराचा निषेध करण्यात येत असल्याचे भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.

इन्फो...

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्याच्या कामासाठी प्रशासनाने परस्पर निविदा मागवल्या. एकच ठेकेदार कंपनी पात्र ठरेल, अशा अटी ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन वेळा निविदा मागवूनदेखील एकच कंपनी पात्र ठरली. आता झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मात्र प्रशासन सोडून भाजपवर टीका होत आहे. म्हणजेच निर्णय प्रशासनाने घ्यायचे आणि दुर्घटना घडली की सर्वांनी प्रशासन सोडून भाजपावर खापर फाेडण्याचे प्रकार सुरू आहेत. ते चुकीचे आहेत, असे जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.