शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बांधकामाला परवानगी देताना ऑक्सिजन बेड अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:52 IST

एकलहरे : कोरोनासारख्या महामारीचे संकट लक्षात घेता आगामी काळात नागरिकांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीत नवीन बांधकाम करणाऱ्या प्रत्येकास ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करण्याचा ठराव एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकलहरे ग्रामपंचायतीचा निर्णय : मासिक सभेत ठराव मंजूर

एकलहरे : कोरोनासारख्या महामारीचे संकट लक्षात घेता आगामी काळात नागरिकांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीत नवीन बांधकाम करणाऱ्या प्रत्येकास ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करण्याचा ठराव एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

एकलहरे ग्रामपंचायतीच्या सदस्या रत्नाबाई दिलीप सोनवणे या कोरोनाशी झुंज देत असताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मयत झाल्या. त्यांना या मासिक सभेत एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मोहिनी जाधव व अन्य सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या सभेत सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी सूचना केली की, कोरोनावर उपाययोजना म्हणून एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत नवीन बांधकाम परवानगी मागणाऱ्यांना ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करावे.

जे ग्रामस्थ नवीन बांधकामासोबत ऑक्सिजन बेड उभारतील त्यांना घरपट्टी करातून सूट देण्यात यावी, जेणेकरून आरोग्यसेवेला प्राधान्य मिळेल. जाधव यांनी केलेल्या सूचनेचे सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून, सूचनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मासिक सभेत ठराव करण्यात आला.

सरपंच मोहिनी जाधव यांनी ठराव बहुमताने मंजूर करून हीच स्वर्गीय रत्नाबाई सोनवणे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. सदर मासिक सभेला ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, उपसरपंच अशोक पवळे, सदस्य नीलेश धनवटे, संजय ताजनपुरे, कांताबाई पगारे, सुरेखा जाधव, शोभा वैद्य, निर्मला जावळे, सुरेश निंबाळकर, विश्वनाथ होलिन आदी उपस्थित होते.(फोटो २७ एकलहरे)-एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोरोनामुळे दिवंगत सदस्या रत्नाबाई सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करतांना सरपंच मोहिनी जाधव, अशोक पवळे, सुरेश वाघ व ग्रामपंचायत सदस्य.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतhospitalहॉस्पिटल