शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली, कोणी नाही पाहिली !

By admin | Updated: June 17, 2017 01:16 IST

नाशिक : जलप्रलयामुळे शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी नाशकात झालेल्या जलप्रलयामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले असले तरी, या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली असून, दोन वर्षांपूर्वी शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी निश्चित केलेल्या निकषावर शासकीय यंत्रणेवर बोट ठेवले आहे. शहर व परिसराला बुधवारी धुवाधार पावसाने झोडपून काढले. वादळीवारा, विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या या पावसाने अवघ्या काही मिनिटातच शहराची दाणादाण उडविली. अख्खे शहर वेठीस धरून जनजीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या पावसामुळे नाशिक जागच्या ठप्प झाले. रस्त्यांवर गुढग्याइतके पाणी साचून ते सखल भागाकडे वेगाने वाहिल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर सराफबाजार, हुंडीवाला लेन, शालिमार चौक, पंचवटीतील रामकुंड परिसरातील दुकानांनाही पाण्याने विळखा घातल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी वीज पंपाचा आधार घ्यावा लागला तर नागरिकांना स्वत:च पाणी उपसून बाहेर काढावे लागले. नाशिक महापालिकेची भुयारी गटार योजना रस्त्यातील पाणी वाहून नेण्यास अपयशी ठरल्याची बाबही या निमित्ताने उघडकीस आली. अवघ्या दीड तासात शहरात ९२ मिली मीटर म्हणजेच चार इंच पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली. शासनाच्या निकषानुसार ६५ मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्याची नोंद ‘अतिवृष्टी’ म्हणून केली जाते, अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे निश्चितच हानी होत असल्याचे शासनानेच मान्य केले आहे. परंतु बुधवारच्या पावसामुळे शहरवासीयांचे काहीच नुकसान झाले नसल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर त्याबाबत पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना नाशिक तहसीलदारांना देण्यात आल्या, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ज्या ज्या जागांवर पाणी साचले तेथे जाऊन पाहणी केली, मात्र कोठेही ४८ तास पाणी साचलेले आढळून आले नाही. शासनाने १३ मे २०१५ रोजी अतिवृष्टीने नुकसान झाल्यास त्याच्या नुकसानीची भरपाई कशी द्यायची याबाबत निकष ठरवून दिले असून, त्या निकषामध्ये नाशिक शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद बसत नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली असली तरी, ती शासकीय यंत्रणेने पाहिलेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.