शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

अवघा समाज एकवटला

By admin | Updated: September 24, 2016 23:18 IST

कळवण : पुरुषांसह महिलांची उपस्थिती लक्ष्यवेधी

कळवण : कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ नाशिक येथे निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील मराठा समाजाची संघटित शक्ती एका झेंड्याखाली प्रथमच एकत्र आल्याने अन्याय-अत्याचाराविरुद्ध मराठा समाज एकवटल्याने गावागावांतून मोर्चासाठी स्थानिक पातळीवरच नियोजन करून वाहनव्यवस्था केल्याने महिला व युवतींसह समाज बांधवाची उपस्थिती लक्ष्यवेधी होती.मिळेल त्या वाहनाने मराठा समाजबांधव नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे कळवण शहर व तालुक्यात शनिवारी सर्वत्र शुकशुकाट होता. त्याचा परिणाम उद्योगधंदे व व्यवसायावर झाला असून, कळवण बंदचे चित्र कळवणकरांना बघावयास मिळाले. तालुक्यातील मराठा समाजाचे सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी , व्यावसायिक, व्यापारी, वकील, डॉक्टर, शेतकरी, शेतमजूर, ठेकेदार, नोकरदार, शिक्षक, शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह युवक-युवती, महिला, बेरोजगार, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते.कळवण तालुक्यात गावातील युवकवर्गामध्ये मोठा उत्साह असल्याने घरोघरी जाऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन युवकांकडून केले गेल्याने युवकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात दिसून आली. मराठा मोर्चासाठी एसटी महामंडळाच्या बसेस, शरद पवार पब्लिक स्कूल मानूर, किड्स लर्निंग स्कूल भेंडी, एसकेडी इंटरनॅशनल स्कूल भावडे, मविप्र समाज नाशिक या संस्थांनी कळवण तालुक्यातील मराठा समाजबांधवांसाठी ठिकठिकाणी वाहन व्यवस्था करून दिल्याने कळवण तालुक्यातून मोठ्या संख्येने महिलांसह समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी नियोजन व वातावरण निर्मितीसाठी कळवण तालुक्यात रात्रंदिवस झटल्याने नाशिकच्या मोर्चात कळवण तालुक्यातून घराघरांतून समाजबांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाचे रवींद्र देवरे, कारभारी अहेर, धनंजय पवार, कौतिक पगार, राजेंद्र भामरे, सुधाकर पगार, शैलेश पवार, विकास देशमुख, जितेंद्र वाघ, देवीदास पवार, जितेंद्र पगार, प्रदीप पगार, हेमंत पाटील, गोविंद पगार, शशिकांत पाटील, निंबा पगार, शीतलकुमार अहिरे, विलास रौंदळ, हिरामण पगार, गौरव पगार, प्रमोद रौंदळ, प्रवीण रौंदळ, प्रमोद पाटील, अमोल पगार आदिंनी केलेली जनजागृती, प्रचार , मार्गदर्शन व प्रयत्नांना शनिवारी यश आले. मोर्चाला कळवण तालुक्यातील समाज एकवटल्याचे चित्र दिसून आले.तालुक्यातील गावागावांतील मराठा समाज एकवटल्याने नाकोडे, खेडगाव, रवळजी, देसराणे, मोकभणगी, ककाणे, बिजोरे, विसापूर, गांगवण, भादवण, पिळकोस, बगडू, भेंडी, बेज, निवाणे, दह्याणे, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, ओतूर, कळवण खुर्द, साकोरे, पाळे, वाडी, एकलहरे, मानूर, कनाशी, बेलबारे, गोसराणे, बार्डे, मोहमुख, ओझर, अभोणा, भगुर्डी, दह्याणे, कळमथे येथील मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (वार्ताहर)मराठा क्र ांती मोर्चाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने नाशकात दाखल झाली. त्या वाहनांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी प्रत्येक वाहनावर स्टिकर लावण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक वाहनावर चारशे रु पयांपासून हजार रु पयांपर्यंत खर्च केला गेला. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे कळवण शहरात मोठ्या प्रमाणात विक्र ी केले गेले. २५ ते ४०० रु पयांपर्यंत विविध आकारांत ते उपलब्ध होते. खासगी वाहनांवर भगवे झेंडे व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावून वातावरण निर्मिती करण्यात युवकांना यश आले. युवक वर्गाने काळे टी-शर्ट, तर महिलाही काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून मोर्चात सहभागी झाल्या होत्या.