शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बहारदार गाणी, खेळांसह रंगले संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:41 IST

जुन्या-नव्या काळातील मनाचा ठाव घेणारी गाणी, मजेशीर खेळांचे सादरीकरण हे सारे वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकमतच्या वतीने झालेल्या ‘सुमधुर गाणी व धमाल गेम शो’ कार्यक्रमात अनुभवत धमाल केली. गायक चेतन थाटसिंगार, संदीप थाटसिंगार, अ‍ॅँकर गुरू हरयानी या कलाकारांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांनी नटलेला हा कार्यक्रम शालिमार येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. १०) सायंकाळी उत्साहात पार पडला.

नाशिक : जुन्या-नव्या काळातील मनाचा ठाव घेणारी गाणी, मजेशीर खेळांचे सादरीकरण हे सारे वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकमतच्या वतीने झालेल्या ‘सुमधुर गाणी व धमाल गेम शो’ कार्यक्रमात अनुभवत धमाल केली.गायक चेतन थाटसिंगार, संदीप थाटसिंगार, अ‍ॅँकर गुरू हरयानी या कलाकारांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांनी नटलेला हा कार्यक्रम शालिमार येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. १०) सायंकाळी उत्साहात पार पडला. व्यासपीठावर नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, सातपूर वृत्तपत्र विक्र ेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर आदी उपस्थित होते. ऊन, पाऊस, हिवाळा कोणत्याही ऋतूत भल्या पहाटे उठून घरोघरी पेपर देणारे विक्रेते, आपल्या वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवत वेळेशी स्पर्धा करणारे त्यांचे काम याची दखल घ्यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  तब्बल तीन तासांहून अधिक चाललेल्या या मनोरंजनात्मक कार्यक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन धमाल केली. थाटसिंगार बंधंूनी ‘झिंगाट’, ‘मन उधाण वाºयाचे’ ‘नदीच्या पल्याड’, ‘गणेश वंदना’ आदी सादर केलेल्या एकापेक्षा एक मराठी, हिंदी गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला. अ‍ॅँकर गुरू यांनी सर्व फुगे फोडणे, लेफ्ट राइट, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे, पहेली असे विविध मजेशीर खेळ घेतले. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी उपस्थित वृत्तपत्र विक्र ेता बांधवांमधून सोडतीद्वारे भाग्यवंत विक्रे ता बांधव व परिवारास भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. लोकमतचे वितरण व्यवस्थापक अखिलेश पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कैलास बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते परिवारासह उपस्थित होते.