शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

आउटसोर्सिंगला हिरवा कंदील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:11 AM

नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आउटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला असला तरी, मागील महासभेत तहकूब ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाकडून हिरवा कंदील दाखविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या आउटसोर्सिंगविरोधात सफाई कर्मचाºयांच्या संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसफाई कर्मचारी भरती येत्या महासभेत वादळी चर्चेची शक्यता

नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आउटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला असला तरी, मागील महासभेत तहकूब ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाकडून हिरवा कंदील दाखविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या आउटसोर्सिंगविरोधात सफाई कर्मचाºयांच्या संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.महापालिकेत १९०० सफाई कर्मचारी कार्यरत असले तरी प्रत्यक्षात १३०० सफाई कर्मचारीच फिल्डवर काम करतात. त्यामुळे सफाई कामगारांची आउटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचा अशासकीय प्रस्ताव यापूर्वी आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष महापालिकेत तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याने सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांसह नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. अशा स्थितीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यात, भाजपा विरोधक असलेल्या शिवसेनेच्या आक्रमकतेकडे लक्ष लागून असणार आहे. शिवसेना या परिस्थितीचा कसा लाभ उठवते, हे पाहणेही लक्षवेधी ठरणार आहे. मात्र, अशासकीय प्रस्तावावर तांत्रिकदृष्ट्या कार्यवाही करणे अवघड असल्याने आयुक्तांमार्फत सदरचा प्रस्ताव मागील महासभेत जादा विषयात मांडण्यात आला होता. त्यावेळी आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता आउटसोर्सिंगद्वारे भरतीचे समर्थन केले होते, तर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व सेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह विरोधकांनी त्यात कडाडून विरोध दर्शविला होता.कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी तर सदरचा महत्त्वाचा विषय जादा विषयात आणल्याबद्दल निषेध करत सभात्याग केला होता. सरतेशेवटी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची सूचना सभागृहनेता दिनकर पाटील यांनी केली होती. त्यानुसार सभागृहाचा नूर पाहून महापौर रंजना भानसी यांनी आउटसोर्सिंग भरतीचा प्रस्ताव तहकूब ठेवला होता.आता येत्या २० फेबु्रवारीला होणाºया महासभेत पुन्हा एकदा वार्षिक २१ कोटी रुपये खर्चाचा आउटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांकडून मूळ विषयपत्रिकेत पहिल्याच क्रमांकावर ठेवण्यात आला आहे. महापालिकेत सरळ सेवेने नोकरभरती करण्यास शासन अनुकूल नाही. मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी आउटसोर्सिंगद्वारेच नोकरभरतीला प्राधान्यक्रम देण्याचे सूचित केलेले आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाकडून आउटसोर्सिंगला हिरवा कंदील दाखविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.